खूप दिवसांचा रखडत चाललेला प्लान अखेर मुहूर्त लागून ठरला. आणि दिल्लीला पोचलो. सुरुवातीला अजिबात वाटत नव्हते की, दिल्लीत आलो आहे म्हणून. त्यापेक्षा मुंबई तरी बरी असे वाटत होते. आल्या-आल्या अशी प्रतिक्रिया का व्यक्त करावी! कदाचित; स्टेशनपासून ते हॉटेलपर्यंतच्या प्रवासात जे दृष्य गाडीच्या खिडकीतून बघत होतो त्यामुळे असावे. ‘दिल्ली ते गल्ली’ ही म्हण आहे की, केवळ एक डायलॉग आहे माहीत नाही पण; दिल्लीतील प्रत्येक गल्ली न्याहाळत होतो. संपूर्ण प्रवास दिल्लीत काय बघण्यासारखे आहे हे बघण्यातच घालवत होतो. वातावरण तसे बर्यापैकी चांगले होते. पण जस-जसा दिल्लीच्या पोटात शिरत होतो. तस-तसा दिल्लीच्या आकाशात धुसर भाग स्पष्ट दिसत होता. हे इतके कटाक्षाने बघत होतो की, एका जाणकाराने सांगितले की, हे प्रदूषण आहे. ज्यात दिल्ली श्वास घेत आहे. पोटात गोळा आला. दिल्लीला यूपी, हरियाणा, उत्तराखंड असे काही राज्य लागून आहेत. त्यामुळे लोक नेमके कोणते हिंदी बोलत होते काही कळत नव्हते. दिल्लीतील खाण्याचे शौकीनपण क्या खूब है! कशात काय टाकतील आणि काय वाढून देतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे पोटाचे आणि जिभेचे नियम काही दिवस बा...
नकळत घटना लिहिण्याची सवय लागली. Unknowingly, I developed the habit of writing down events.