नंबर केव्हा येतो याची वाट बघता बघता खिडकीच्या आतील लोकांची जेवणाची वेळ झाली आणि काऊंटर अर्धा तासासाठी बंद झाले. आम्ही ओळीतील 15-20 जणांनी स्वतःचे नंबर घेऊन रांग मोडली. मी, इकडे-तिकडे जाण्यापेक्षा खिडकीपाशी उभे रहाण्याचे पसंत केले. समोरील लोकांचे चेहेरे बघता-बघता एका रूममधून सुंदर तरुणी बाहेर पडली. तिच्या केसांची एक लट गालावरून फिरत होती. दातांची एक सारखी ठेवन तिच्या स्मित हास्याने दिसत होती. तिच्या डोळ्यांचा खेळ समोरच्याला खेळवत होती. कमनिय बांधा, साधे रहाणीमान, तिचे ते चालणे जणू मी याच्या आधी बघितल्यासारखे वाटले. आणि एकदम राधाचीच आठवण झाली. (फ्लॅशबॅक) सुधीर - “भाऊ, महिना झाला तू तिच्याकडे सारखा बघतोय पण तुमच्यात काही बोलणं झालं नाही.” अविनाश - “हं.. शेवटचे दिवस राहीले. परत भेट नाही होणार जे काही बोलायचे ते आजच बोलून टाक.” शरद - “यार, फे्रंडशिप तरी मागच तू.” तमखाने - “होऊन जाऊ दे आज काहीतरी आर या पार.” बोलता बोलता आमचा वर्ग सायन्स हॉल मधे घुसला. सरांची वाट बघत असतांना कुणीतरी हॉल मधील खिडक्या उघडल्या. त्याच रांगेत समोर दोन हाताच्या अंतरावर मुलींचा सायन्स हॉलच्या खिडक्या होत...
नकळत घटना लिहिण्याची सवय लागली. Unknowingly, I developed the habit of writing down events.