मुख्य सामग्रीवर वगळा

त्या नग्न स्त्रीने माझा हात धरला तेव्हा...

‘घनकर गल्लीत एक प्रिंटींग जॉब टाकू... घरी जाऊ... आणि डबा घेऊन जॉबवर निघून जाऊ.’ असं स्वतःशी पुटपुटत मी गाडी मेनरोडवरून रेडक्रॉसकडे टाकली. पहातो तर गाड्यांची ही भली मोठी रांग लागलेली. मी या गर्दीतून गाडी काढू कशी म्हणून गादी बंद केली आणि रस्त्याच्या कडेला भिंतीलगत उभा राहून गंम्मत पहात होतो. एम.जी.रोडवरून कसला तरी मोर्चा निघाला होता. म्हणून रविवार कारंजा वरून येणार्‍या गाड्या थांबवल्या असाव्यात असा निष्कर्ष मी काढला. कदाचित मोर्चामधील घोषणाबाजीमुळे गर्दीत गाड्यांचे आवाजही शांत झालेले होते. उभ्या राहिलेल्या प्रत्येक गाडी, व्यक्ती, परिसरातील घडामोडी भरभर बघत होतो. माझ्या समोरच असलेल्या भव्य दोन इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर कुटुंबातील मंडळी गर्दी करून मजा बघत होते.
गर्दीमध्ये प्रत्येकाला घाई ही होतीच. केव्हा रस्ता मोकळा होईल याचीच वाट बघत होते. तेवढ्यात मी जिथे उभा होतो तिथल्याच पायवाटावरून ती नग्न बाई घाबरलेली आणि गोंधळलेल्या अवस्थेत झपाझप पावलं टाकीत माझ्या दिशेने येत असलेली पाहिली. गर्दीतील लोकांना मारण्यासाठी सारखी एक हात हवेत झटकत होती. दुसर्‍या हातात वाकलेली काठी टेकत होती. डोळे वाकडे-तिकडे करत, मानेला झटके देत, तोंडात शिव्यांचा पाडा, केस कडक झाल्याने उभे आणि विस्पारलेले होते. अंगावर एकही कपडा नव्हता. ती फक्त नावालाच बाई असल्याचे दिसत होते. शरीरयष्टी काटकुळी, छातीचा सापळा झाला होता. पोट खपोटीला गेले होते. खाली अस्ताव्यस्त केस वाढलेले तर पायांच्या काड्या झाल्या होत्या.
ती जसजशी माझ्या दिशेने येत होती तसा मी घाबरलो होतो. माझी नजर वळते न वळते तिने एक्सलेटरवरचा हात धरला. माझी पुरती गाळण उडाली. माझे पाणीपाणी झाले होते. तिचा अंगाचा घाणेरडा वास नाकाला झोंबला. ती पूर्ण ताकदीने माझा हात ओढत होती. तिच्या हातातून माझा हात कसाबसा सोडला. ती तशीच शिव्या हासाडत पुढे निघून गेली. वळवलेली नजर हळुहळु गर्दीकडे फिरवली. तिथे जमा असलेली सर्व लोकं माझ्याकडे बघत होती. अक्षरशः बस मधील उभे असलेले लोकं खिडकीतून वाकुन माझ्याकडे पहात होती. त्या दोन्ही इमारतीमधील मंडळी माझ्याकडे बघत होती. माझे कान सुन्न झाले होते. हृदयाचे ठोके वाढले होते. तिचा तो कर्कश आवाज, अंगाचा घाणेरडा वास आणि ते शरीर. मी जसे काही जिवंत भुत बघितले की काय असे वाटत होते. 
तेवढ्यात गर्दीतल्या गाड्यांचा आवाज सुरू होऊन गाड्या पुढे सरकु लागल्या. माझं काहीतरी हरवल्यासारखं झालं होतं. डोक्यावरचा घाम कॉलरने टिपत बंद पडलेला मेंदु गाडीला किक मारावी तसा चालू करत होतो. तितक्यात माझ्या खांद्यावर भारदस्त हात पडला. मी घाबरूनच पटकन वळून पाहिलं.
‘बेटा... घाबरलास का ?’ सरदारजी मला विचारत होते. मी आपला हो नाही करत फक्त मान हालवत होतो.
स्कूटरवर सरदारजी; मागे त्यांची घरवाली; आणि दोघांमध्ये सॅण्डविच झालेलं त्यांचं पोरगं.
‘बेटा... घरी जा. तोंड हातपाय धू. आणि मस्त चहा पी. बरं वाटेल तुला.. बघ.’
त्यानं मला चक्क दिलासा दिला ओ ! त्याच्या बायकोकडे पाहिलं तर तिने भावही दिला नाही. तिच्या मुलाच्या तोंडावरून हात फिरवत तिकडे तोंड वळवून घेतले. दंडावर शाब्बासकीची थाप देत सरदारजी निघून गेले. तो दिसेनासा होईस्तोवर मी गाडीवर बसून होतो. गर्दी विरळ झाली होती. चेहेर्‍यासमोरून ते भुत जातच नव्हतं....
मी थेट घरी. गाडीवरचं (पेपरचा गठ्ठा) आणि माझ्याकडचं (बॅग) ओझ खाली पटकलं. बाथरूममध्ये तोंडावर भरभर पाणी मारलं. तिथेच पाटावर बसून होतो.
(मनात) असं माझ्याच बाबतीत का घडावं. तेही इतकं किळसवाणं आणि घाणेरडे. छि... बाईची अशी कल्पना देखील मनातून केली नाही. आणि आज तर चक्क अनुभवलं.
उठलो. किचनमध्ये आईने चहा दिला. कप घेऊन हॉल मध्ये आलो. चहाचा पहिला झुरका घेत सरदारजीची आठवण झाली.
‘तो चक्क मराठीत बोलला’ असं म्हणत स्वतःच हसत होतो.
‘कोण बोलला मराठीत ? आणि असा एकटाच का हसतो आहेस’ आजी हॉल मध्ये विणकाम करीत असतांना बोलली. 
मी झालेला सर्व प्रकार आई-आजीला सांगितला. त्या दोघीही थोड्या घाबरल्याच.
‘मी काय म्हणते ! आधी त्याची दृष्ट काढ. मगच त्याला घराबाहेर पडू देत.’ आजीने आईला सांगितले. (कदाचित माझं हसणं आणि झालेला प्रकार सांगितल्यानंतर आजीने पटकन दृष्ट काढ असे सांगितले असावे.)
देवापाशी आसन टाकून बसलो. आई दृष्ट काढतांना काहीतरी म्हणत होती. माझे लक्ष देव्हार्‍यातच होते.
जे बघीतलं ते एक भयानक स्वप्न होतं म्हणून विसरून जा असा आवाज आतून आला. आयुष्यात बर्‍याच चांगल्या-वाईट गोष्टी प्रत्येकाला अनुभवायला मिळतात. माझ्याही बाबतीत असेच काही घडले असावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली. ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की. त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला. “ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.” क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता. वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.” डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कद...

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......