मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

opal stone लेबलसह पोस्ट दाखवत आहे

निलम, गोमेद, ओपेल भाग 2

काढून ठेवलेले रत्न त्यांनी एका पाकिटात टाकत “ह्यांचा काय परिचय” हनुवुटीने इशारा करत दाजींकडे पाहिले.  काकांच्या पटकन लक्षात यावे म्हणून दाजींनी त्या-त्या लोकांचा परिचय देवून माझे नाव त्या-त्या लोकांना लावले. नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि तेथून निघालो. दाजींना घरी सोडून मीही निघालो.  सांगितलेल्या दिवशी मी फोन करून त्यांच्या दुकानात गेलो. “या बसा. तुमच्या अंगठ्या तयार होवून मंदिरात गेल्या आहेत.” “अंगठी कोणत्या बोटात घालायची आहे माहिती आहे का?” असे म्हणत काकांनी मी दिलेला कागद परत केला. मी ‘नाही’ म्हणून मान हलवली. कदाचित माझा पडलेला चेहेरा पाहून “बाळ, तू खुप दुःखी वाटत आहेस. काय झाले तुला? आणि या अंगठ्या का बनवतो आहे? ते म्हणाले. मी त्यांना सांगायला सुरवात केली. तेवढ्यात तो व्यक्ती अंगठी घेवून आला. त्या डबीमध्ये छान गुलाबी रंगाचा मखमली कपड्यात दोन अंगठ्या ठेवल्या होत्या. काकांनी स्वतः त्या अंगठ्या माझ्या बोटात परिधान करून दिल्या. “घातल्या आहेस आता काढू नको.” असे सांगितले. अंगठी इतकी सुंदर होती की, त्या परिधान केल्यावर मी राजा झालो आहे असे काही वाटत होते. मी त्यांना लगेचच...

निलम, गोमेद, ओपेल भाग 1

“तुम्ही कधीपासून खड्यांवर विश्वास ठेवायला लागले?” ज्योतिष कार्यालयामध्ये रिसेप्शन काऊंटरवर वहिनी बसल्या होत्या. त्यांनी माझा मिश्किल चेहेरा बघत प्रश्न विचारला. “परिस्थिती अशी काही पुढे आली आहे की, ज्यांनी-ज्यांनी जे-जे करायला सांगितले ते-ते करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. “हं... मला ह्यांनी थोडं सांगितले आहे. अहो.. एवढे निराश नका होऊ. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख आहेच की.” वहिनींनी शाब्दीक दिलासा देत माझी कुंडली पुस्तिका घेवून सरांच्या केबिनमध्ये गेल्या. वहिनी बाहेर येवोस्तर ज्योतिष कार्यालयाच्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती वाचत बसलो. पाठीला पाठ लावून बसलेल्या एका राशीला स्थिर झालो. “ती तुमच्या काही कामाची नाहीये.” वहिनींचे सर स्वतः बाहेर येऊन दमदार आवाजात मला म्हणाले. डोळ्यावरचा डे-नाईट चष्मा काढून “या बसा...” म्हणत त्यांनी मला न्याहाळले. त्यांचे ते काळेभोर केस, दाट काळ्या मिश्या, गुबगुबीत गोरे गाल, गळ्यात सोन्याची जाड चैन, पांढरे कपडे, मनगटात सोन्याचे ब्रेसलेट, दोन्ही हातांच्या बोटात मोठाले रत्न, एका हातात मोबाईल, दुसरा टेबलवर आणि दुसर्‍या हातात माझे फाटलेले कुं...