मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Prachiti लेबलसह पोस्ट दाखवत आहे

निवेदनाची पुरतता आणि प्रचिती

कसाबसा रेनकोटमधून फोन काढला नी कानाला लावला. भाईं (काका) (टेन्शनमधे) - “अरे!, तु कुठे आहेसऽऽ?, गंगेला पुर आला आहे. अजुन कितीतरी क्युसीएस पाणी सोडणार आहे. घरात पाणी शिरणार आहे. तुझा कॉमप्युटर, सामान तसेच आहे. सगळे सामान हलवले आहे. तुझेच सामान हलवायचे बाकी आहे. लवकर घरी ये. तुझी सगळे वाट पाहत आहे.” मी (दबलेल्या आवाजात) - “हो... आलो भाई. फोन कट.” डोळ्यात टचकन पाणी आले. काय करावे समजत नव्हते. अशोक स्तंभावर एका कोपर्‍यात एकटाच हतबल होऊन उभा होतो. छिनबिन अवस्थेत जमीनीकडे एकटक लावून पहात होतो. फोन ठेवून त्याच ठिकाणी दोन्ही हात जोडले (मी एका व्यक्तीचे स्मरण केले. जागेवर निवेदन ठेवले). मुसळधार पाऊस थोडासा संतगतीने पडत होता. दुपारचे किती वाजले माहित नव्हते. माझा रेनकोट आतूनसुद्धा ओला होता. बोटं गोठून गेली, अंगात ताकत नव्हती, पोटात अन्नाचा कण नव्हता. तरी जड पाऊले उचलली आणि थेट शेखर काकांचे प्रेस गाठले. मी - “सर, फाटे सरांनी जॉब कॅन्सल केला आहे. ते डिलिव्हरी घेणार नाही.” काका (हैराण होऊन) - अरे, काय सांगतो तू हे! 1 लाखाची ऑर्डर आहे ती. म्हणजे सगळे पैसे, मेहनत पाण्यात जाणार. फाटे मॅडमशी प्...