- आईने आजीला सांगितले. सकाळचा पहिला आवाज एैकत मी उठलो. ‘‘राजा, दूधाची पिशवी आणि पेपर घेऊन ये जा पटकन.’’ आईने मला सांगून सडा-रांगोळी करण्यासाठी निघून गेली. मी आपला आळस देत उठलो. दूध डेअरीत आलो. डेअरीवाला आलेला नव्हाता, म्हणून तेथे उभा होतो. डेअरीसमोर बालाजी मंदिर आहे. तेथे सकाळच्या मोठ्या ककर्श आवाजात माईकवर कीर्तन चालू होते. त्याच्याच शेजारी साई मंदिरातील डीजे साऊंडमध्ये काकड आरती चालू होती. डेअरीच्या मागे शंकाराचे मंदिर आहे. तेथे अभिषेक चालू होता. तेवढ्यात आमचा डेअरीवाला भाऊ आला. एका हातात किटली, दुसर्या हातात मोबाईल, कानात हेडफोन. ते काढताच बारीक आवाज माझ्या कानावर पडला. ’ये है ९....एफएम, ईटस् हॉट’. मी दूध घेऊन घरी आलो. जोरजोरात घंटीचा आवाज आला. आजीची देवांना आंघोळ घालायला सुरूवात झाली. दूध दिले आणि मी अंघोळीला निघून गेलो. ‘‘राजा; मुकेश साहेबांचा पेपर आपल्याकडे आलाय. तो त्यांना देऊन ये.’’ आई बोलली. मी आपलं आवारलं आणि पेपर द्यायला निघालो. आमच्या शेजारीच मुकेश सराचे ऑफीस असल्याने पटकन निघालो. तेवढ्यात गॅसवाल्याने घरासमोर त्याची ती बरीच आवाज करणारी गाडी लावली. अनं त्यातलं सिलें...
नकळत घटना लिहिण्याची सवय लागली. Unknowingly, I developed the habit of writing down events.