मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Latrine लेबलसह पोस्ट दाखवत आहे

संडास

“सर मला खालच्या जागी काय झाले आहे काही समजत नाही. मला असह्य वेदना होत आहे.” कुलकर्णी सरांनी नाकाच्या टोकावर ठेवलेल्या चष्म्यावरून माझ्याकडे बघत “बघू बरं... पॅन्ट काढ. झोप तिथे” असे म्हटल्याबरोबर त्या असिस्टंट डॉक्टरने पडदा बाजूला करत काहीतरी तयारी करायला घेतली. हे असे उघडे करून दाखवण्याची माझी पहिलीच वेळ. लाजंकाजं पॅन्ट काढत एकाकानावर झोपलो. ढुंगण ताणून “अरे तुला फिशर आहे!” असे म्हणत सरांनी खपकन गुदद्वारात बोट घातले. मी “अइय्यो” करत विव्हळलो. आणि भसकन बोट ओढून बाहेर काढले. उघड्या ढुंगणावर चापट मारत “उठ झालं...” असे म्हणत सर खुर्चीवर बसले. मी इज्जत गेल्यासारखे शर्ट खाली केला आणि उठून बसलो. असिस्टंट डॉक्टर माझ्या त्या जागेकडे बघुन अर्धे झोपलेल्या डोळ्यागत गंभीर चेहरा करून मिश्किलपणे पहात होता. पॅन्ट घालून सरांसमोर जाऊन बसलो. “सर हे फिशर काय असते?” कन्हणत प्रश्न केला. “अं... काही नाही... आता त्याचा विचार करू नको. या गोळ्या घे. आठ दिवसांनी दाखव.” भराभर औषधे लिहून माझ्या हातात कागद टेकवला. माझी ती जागा दुखतही होती आणि गारगारही वाटत होती. त्या जागी काय झालं?, काय केलं? कसं विचारू? समजत नव्हत...