धाडकन आवाज झाल्याने रात्रीचा किरर्र आवाज थोडावेळ शांत झाला. त्या चौघा-पाच जणांनी रावसाहेबांकडे धाव घेतली. मीही माझी गाडी बाजुला उभी करून साहेबांकडे धावलो. रस्त्यावरच्या चिखलपाण्यात राव पालथे पडले होते. रक्तबंबाळलेला चेहेरा पाहून छातीत धडधड सुरू झाली. त्यांचा चेहेरा, अंगावरचे कपडे रक्ता-चिखलाने माखलेले होते. बघणारे लोकं हळूहळू आवाजात बरे-वाईट पुटपुटत होती. साहेबांना सावरायला मी एकटाच होतो.... समारंभ आटोपून आम्ही पाचही एकच्या सुमारास बाहेर पडलो होतो. त्या शुकशुकाटात आमच्या गाड्या भरधाव वेगाने वेगवेगळ्या दिशांना फिरल्या आणि रावसाहेबांच्या बाबतीत असे घडले. त्यात त्यांचा फोन आपटल्याने कोणाशीच संपर्क होणार नव्हता. मिनमिनत्या प्रकाशात रावसाहेबांचं सामान कुठे काय पडलेलं होतं काही समजलं नाही. मी हतबल होतो. ‘कुणीतरी रिक्षा बोलावता का..., मदत करा माझी...’ मी लोकांवर अक्षरशः रेकुन अखेर बोललो. साहेबांच्या गालात मारत शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होतो. ते कुठल्याच हाकेला साथ देत नव्हते. एका डोळ्याच्या वर जबर मार बसल्याने रक्त खूप वहात होते. तेवढ्यात रिक्षा उभी करून त्या भल्या व्यक्तीने मला घाई ...
नकळत घटना लिहिण्याची सवय लागली. Unknowingly, I developed the habit of writing down events.