डोळे चोळत झोपेतून उठून बसलो (फोन कानाला लावत) “काय रेऽऽऽ” रेकलेल्या म्हशीसारखा आवाज काढत “आपल्याला मौतीला जायचं आहे.” रावसाहेब “कुणाच्या” “महेशच्या म्हातार्याच्या” रावसाहेब “कधी” “अख्खी माहिती फोनवरच विचारून घे. लवकर उठ. त्या अण्णाला फोन कर. दोघेही स्टँडवर येऊन उभे रहा. मी निघालो.” फोन कट... मिचमिचे डोळे करून खिडकीच्या बाहेर नजर टाकत अण्णाला फोन लावला. पाऊसाची रिपरिप चालू होती. वातावरण चांगलेच थंडगार झाले होते. घड्याळाकडे पहात अण्णाला रावसाहेबाचा निरोप दिला. सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघे स्टँडवर येऊन त्याची वाट पहात गप्पा मारत होतो. रिमझिम पावसात सायलेन्सरचा पुटपुटलेला आवाज करत रावसाहेबाची गाडी आमच्यासमोर येऊन उभी राहिली. रावसाहेबाची उंची कमी असल्याने रेनकोटमध्ये रावसाहेब झाकून गेलेला होता. पावसाच्या पाण्यात पानाचा तोबरा थुंकत गाडीवरून पुढे सरकला. आम्ही दोघे एकमेकांकडे बघत त्याच्या पाठीमागे गाडीवर बसलो. दोन बोटात माणिकचंदच्या पुड्या धरून हवेत हात झटकले. “आत्ता खाऊ नका. मामाची मिसळ खाऊन झाल्यावर खा.” सक्त ताकीत देत गाडीचे एक्सलेटर पिळले. पुटपुट करत गाडी हसणापूरला निघाली. शहर सोडून गावाक...
नकळत घटना लिहिण्याची सवय लागली. Unknowingly, I developed the habit of writing down events.