मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नियति लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रारब्ध

असेच एका रात्री मी आणि अण्णा फेरफटका मारण्यासाठी गंगेवर निघालो. कुठे जावं ? म्हणून रामवाडी पुलामार्गे जाण्यास निघालो. आमच्या शेजारून गोदावरीचे पाणी संथ गतीने वाहत होते. पाय वाटेवर लोकांची वर्दळ तशी कमी होती. बारमध्ये जसे मिणमिणते दिवे असते तसे महापालिकेच्या दिव्यांचा प्रकाश पडलेला होता. रात्र किररं करत होती. नदी काठचे बेडकं गळा फुगवत बोंबा ठोकीत होती. पुलावरून एखाददोन गाड्यांचे आवाज येत होते. वार्‍याचा पत्ताच नव्हता आणि आम्ही दोन भुतं त्या रस्त्याने मस्त गप्पा मारत चाललो होतो. अधनं-मधनं एखाददोन डोकी दिसली नंतर कुत्रे सोडून कुणी एक दिसत नव्हतं. रामवाडी पुलापर्यंत पोहचलो. आमच्या गप्पा रंगत किती वेळ झाला याचे भान दोघांना नव्हते. मी आणि अण्णा परतीला पायी चालायला सुरूवात केली. गंमतीदार विषय चालु असतांना आण्णाचे लक्ष नदीकाठच्या कठड्यावर गेले आणि त्या दिशेला तो भरभर चालून कठड्यावरील ती चमकलेली वस्तु घेतली. मी आपला कुतुहलाने पुढे सरकलो. पाहिलं तर अण्णाला चष्मा सापडला होता. अण्णाचे पुढचे प्लॅन सुरू झाले. ‘‘चला... आणखी एक फ्रेम झाली, पुढील दोन वर्षे काही टेंन्शन नाही. उद्याच जाऊन काच बसवून...