मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......

करंवला

“आयुष्यभर असाच करंवला राहा!” योगेशने शेवटचे वाक्य बोलून फोन कट केला. कानाला लावलेला फोन कानापासूनच सोडून दिला. एकटक बघत लहानमुल जसं जमिनीवर हात-पाय पसरून बसतो तसा सुन्न अवस्थेत बसलेलो होतो. नंतर जे हंबरडा फोडून रडायला लागलो. स्वतःच्या गालात जोर-जोरात मारायला लागलो. मोबाईल फेकुन दिला. तोंडातून लाळ गळत होती. जमिनीवर लोळत होतो. तेवढ्यात खिडकीतून कुणीतरी डोकावतंय म्हणून पटकन स्वतःला सावरले. किचनमधे पळालो. “अण्णा... कुठेयेस तू? गुलाबाचे फुलं आणि टेप घे. चल लवकर.” “हो...ऽऽ आलो-आलो. बाथरूममधे आहे.” सपा-सप डोळ्यावर पाणी मारले. आरशासमोर उभा राहीलो. तोंड आणि डोळे लाल झाले होते. हे सोंग लपवु कसं म्हणून कधीही पावडर न लावलेला हा चेहेरा पावडर लावत होता. कसाबसा स्वतःला आवरले आणि दरवाजा उघडला. “चल-चल. लवकर आटप. नवरदेव निघालाय. गाडी सजवून हॉलकडे जायचे आहे.” दाजी घाई करत होते. गाडी धुवून-पुसुन फुलं चिकटवायला घेतली. डोक्यात योगेश जे बोलला तेच विचार घोळत होते. त्याच्यावर भयंकर चिडलो होतो. नाहीनाही ते बोलून गेला. मी निमुटपणे ऐकत होतो. पण त्याचं बोलणही सत्य होते. षंड जसा वागतो तसा मी माझ्या आयुष्यात वागत हो...

निलम, गोमेद, ओपेल भाग 2

काढून ठेवलेले रत्न त्यांनी एका पाकिटात टाकत “ह्यांचा काय परिचय” हनुवुटीने इशारा करत दाजींकडे पाहिले.  काकांच्या पटकन लक्षात यावे म्हणून दाजींनी त्या-त्या लोकांचा परिचय देवून माझे नाव त्या-त्या लोकांना लावले. नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि तेथून निघालो. दाजींना घरी सोडून मीही निघालो.  सांगितलेल्या दिवशी मी फोन करून त्यांच्या दुकानात गेलो. “या बसा. तुमच्या अंगठ्या तयार होवून मंदिरात गेल्या आहेत.” “अंगठी कोणत्या बोटात घालायची आहे माहिती आहे का?” असे म्हणत काकांनी मी दिलेला कागद परत केला. मी ‘नाही’ म्हणून मान हलवली. कदाचित माझा पडलेला चेहेरा पाहून “बाळ, तू खुप दुःखी वाटत आहेस. काय झाले तुला? आणि या अंगठ्या का बनवतो आहे? ते म्हणाले. मी त्यांना सांगायला सुरवात केली. तेवढ्यात तो व्यक्ती अंगठी घेवून आला. त्या डबीमध्ये छान गुलाबी रंगाचा मखमली कपड्यात दोन अंगठ्या ठेवल्या होत्या. काकांनी स्वतः त्या अंगठ्या माझ्या बोटात परिधान करून दिल्या. “घातल्या आहेस आता काढू नको.” असे सांगितले. अंगठी इतकी सुंदर होती की, त्या परिधान केल्यावर मी राजा झालो आहे असे काही वाटत होते. मी त्यांना लगेचच...