तावा-तावा पायर्या चढत गच्चीवर गेलो. डोक्यात सणक गेली होती. जोरजोरात हात, पाय झाडत होतो. साचलेल्या पावसाच्या पाण्याने अंगावरचे कपडे खराब करून घेतले. दात आवळत, हाताची मूठ कठड्यावर मारत होतो. राग कोणावर व्यक्त करावा असं झालं होतं. गच्चीवरून खाली सोसायटीतल्या गाड्या दिसत होत्या. असं वाटत होतं सरळ स्वतःला झोकून द्यावं. कठड्यावर उभा राहिलो. जीव घाबरत होता. प्रयत्न होत नव्हता. कापसासारखा पाऊस चालू होता. वार्याची सर मागे ढकलत होती. पोटात भीतीचा गोळा उभा राहिला. “डबा तयार आहे खाली या” हिने खालून आवाज दिला. “श्याऽऽऽ.. च्या आईला...” म्हणत कठड्यावरून उतरलो. टाकीत पाणी किती आहे हे बघण्यासाठी लोखंडी जिना चढत असताना जाडी काळी ढभुरी पाल पाइपावरून पळताना दिसली आणि पळताना धापकन गच्चीवर पडली. तिची काहीच हालचाल दिसत नव्हती. कदाचित मेली असावी. पाण्याच्या टाकीत डोकावून पाणी बघून खाली उतरलो तर गच्चीवर ती पाल कुठेच दिसली नाही. घरात शिरताच पुन्हा हिने भांडणाचा सूर ओढला. “हे काय..., पाणी पाहिला गेले होते; मग कपडे कसे काय खराब झाले! पडले की काय?.” मी एक नाही दोन नाही. “येतांना भाजी घेऊन या. त्याचे फिट्सवर...
नकळत घटना लिहिण्याची सवय लागली. Unknowingly, I developed the habit of writing down events.