मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Grandmother लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नानी आत्या

मी भयानक स्वप्न बघून दचकलो आणि डोळे उघडले. त्या अंधारात म्हातारे विस्फारलेले केस, सुकलेला चेहेरा मोठे खोल गेलेले डोळे, लांब मोठे नाक, बारीक तोंड असलेला चेहेरा माझ्या चेहेर्‍या समोर होता. कपड्यात मुतावा असा वास माझ्या नाकाला झोंबला. पुरता घाबरलेल्या अवस्थेत ‘आजी’ करून मोठा आवाज दिला. आजी ताडकन झोपेतून उठून खरखर केलेल्या आवाजात ‘कायऽऽऽ रेऽऽ...’ करत माझ्या दिशेने बघितले. ‘मेली थेरडे...’ म्हणत आजीने हॉलमधला लाईट लावला. नानी आत्या माझ्या चेहेर्‍याला हात लावणार मी करंट लागल्यासारखा पटकन सरकलो. आजीने नानी आत्याचे खवाटे धरले तसे ओढत तीला तिच्या जागेवर नेऊन पटकवले. ‘हरामी साली; आता रात्रीच्या वेळी पोरांना घाबरवते काय... तुला आता बघते थांब...’ मी त्या दोघांची धांदल गुडघ्यात डोके घालत बघत होतो. तिरपी नजर करत घड्याळात रात्रीचे तीन वाजले होते. रात्रीतून नानी आत्या भोवती आजीने बॅरीकेटस्‌ लावले. ‘(नानी आत्या) तुला सकाळी बघते. (माझ्याकडे फिरून) काय रे... घाबरलास का?..., काय केलं तीनं तुला.’ मी (संभ्रमअवस्थेत) ‘अ... काही नाही, ती जवळ येऊन काय करत होती कायऽऽऽ माहित. (मधेच) तीने साड...