“तुम्हाला काही समजले का?” अजय “म्हणजेऽऽ?, तुम्ही नेमके कशाबद्दल बोलताहेत?” मॅकी “मला पंडित सरांचा फोन आला होता. आशा... हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. त्या मुंबईला आहेत.” अजय “अहोऽऽ... काय सांगताय! मी आत्ता काही दिवसापूर्वीच तिला फोन केला होता. पण तिचा फोन अभिमन्यूने घेतला होता. सांगत होता की, ‘रूटीन चेकअपसाठी दवाखान्यात आलो आहोत. ती आतमध्ये आहे. मी तिला फोन करायला सांगतो’ म्हणून. त्याच्यानंतर काही फोन नाही. का? काय झाले त्यांना?” मॅकीने घाबरूनच विचारले. “अं... बातमी तशी एक चांगली आहे आणि एक वाईट आहे. त्यांना दोन जुळी मुलं झाली आहेत आणि दुसरी म्हणजे त्यांचा एक पाय कापावा लागला.” मॅकीने मोठा श्वास भरला आणि रिसिर्व्हरवरच ‘बापरेऽ’ करत सोडला. अजय थोडा थांबून “आताऽऽ... पाय का कापवा लागला ते एवढं नीटसं कळलं नाही पण; तुम्ही त्यांना फोन जरूर करा. ते तुमच्या फोनची वाट बघत असतील.” टु...उक, टु...उक, टु...उक फोन वाजत राहिला. मॅकीचे डोळे भरून आले होते. हाताला घाम येत होता. फोन ठेवून तो पॅन्टला सतत हात पुसत होता. नंतर अश्रू अनावर झाल्याने हुंदके देत रडत होता. तिच्याबाबतीत असे का घडले?... मॅकीचे काम असल्य...
नकळत घटना लिहिण्याची सवय लागली. Unknowingly, I developed the habit of writing down events.