मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Karvala लेबलसह पोस्ट दाखवत आहे

करंवला

“आयुष्यभर असाच करंवला राहा!” योगेशने शेवटचे वाक्य बोलून फोन कट केला. कानाला लावलेला फोन कानापासूनच सोडून दिला. एकटक बघत लहानमुल जसं जमिनीवर हात-पाय पसरून बसतो तसा सुन्न अवस्थेत बसलेलो होतो. नंतर जे हंबरडा फोडून रडायला लागलो. स्वतःच्या गालात जोर-जोरात मारायला लागलो. मोबाईल फेकुन दिला. तोंडातून लाळ गळत होती. जमिनीवर लोळत होतो. तेवढ्यात खिडकीतून कुणीतरी डोकावतंय म्हणून पटकन स्वतःला सावरले. किचनमधे पळालो. “अण्णा... कुठेयेस तू? गुलाबाचे फुलं आणि टेप घे. चल लवकर.” “हो...ऽऽ आलो-आलो. बाथरूममधे आहे.” सपा-सप डोळ्यावर पाणी मारले. आरशासमोर उभा राहीलो. तोंड आणि डोळे लाल झाले होते. हे सोंग लपवु कसं म्हणून कधीही पावडर न लावलेला हा चेहेरा पावडर लावत होता. कसाबसा स्वतःला आवरले आणि दरवाजा उघडला. “चल-चल. लवकर आटप. नवरदेव निघालाय. गाडी सजवून हॉलकडे जायचे आहे.” दाजी घाई करत होते. गाडी धुवून-पुसुन फुलं चिकटवायला घेतली. डोक्यात योगेश जे बोलला तेच विचार घोळत होते. त्याच्यावर भयंकर चिडलो होतो. नाहीनाही ते बोलून गेला. मी निमुटपणे ऐकत होतो. पण त्याचं बोलणही सत्य होते. षंड जसा वागतो तसा मी माझ्या आयुष्यात वागत हो...