मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रहण

सकाळची कामे आटोपून आम्ही तिघे जेवायला बसलो होतो. तेवढ्यात आईचा फोन आला, ‘आज ग्रहण आहे तुम्ही सकाळीच जेवून घ्या. या वेळेनंतर काहीही खाऊ नका. संध्याकाळी ग्रहण संपल्यावर अंघोळ करा. देवपूजा झाली की, मग जेवायला बसा.’ असे तिने सांगितले. आम्ही असे कधी केले नव्हते पण ठरवले की, सांगितल्याप्रमाणे करू. प्रयत्न करायला काय हरकत आहे. जेवण झाल्यावर ड्युटीवर निघून गेलो. दुपारी जेवणासाठी आम्ही ऑफीसमधील मंडळी एकत्र आलो. मी ‘डबा का नाही आणला?’ याचे कारण सांगितल्यावर त्यांनी ग्रहणाचा विषय लावून धरला. प्रश्नांचा नुसता भडिमार सुरू झाला. असे कुठे असते का भाऊ कलियुग चालू झाले? पृथ्वीवरील व्यवहार काही थांबणार आहे का? खाल्लं-पिल्लं तर काहीही होत नाही? आजपर्यंत कुणाचे काही वाकडे झाले का? तुला लई पथ्य-पाणी बाबा!, मी बघ 60 वर्ष पूर्ण झाली आजपर्यंत नाही ग्रहांची ना ग्रहणाची बाधा असं जगायचं असतं खाओ-पिओ मौज करो? वगैरे-वगैरे... सगळ्यांचं ऐकून झाल्यावर मी गच्चीवर निघून गेलो. ग्रहणाविषयी विचार करत राहिलो, आपण असे कधी ‘धरणं, सोडणं, पाळणं’ केले नाही. पण आज असे का जागृत झालो? मनात एकच विचार होता की, आईने सांगितले म्हणून. ...