मुलाला शाळेतून घरी आणले तोच गरम चहाचा कप हातात आला. मोबाईल चालु करून एक एसएमएस बघीतला. माझे कान एकदम गरम झाले. अकाऊंटमधून पाच हजार कट झाल्याचा तो एसएमएस पाहून मनाची चलबीचल आणि विचारांचे जाळे विणायला सुरूवात झाली. कप ठेवला. घरात न बोलता जवळचे एटीएम गाठले. बॅलेंस चेक केला. किरकोळ रक्कम शिल्लक ठेवून बाकी काढून घेतली नि घरी आलो. माझा उतरलेला चेहेरा पाहून “इतक्या घाई घाईने कुठे गेला होता.” म्हणून हिने विचारले. एसएमएस दाखवत बोलायला सुरूवात केली. कुणास ठाऊक तिला कितपत समजले! मलाही काही समजेनासे झाले. रक्कम अशी जाऊ शकते का? या विचाराने दोघेही बुचकळ्यात पडलो. त्या मंथन-चिंतनात वेळेचे भान आले कारण बराच वेळ असाच निघून गेलेला होतो. तोंडावर पाणी मारून कसेबसे आटोपले आणि देवापुढे बसून झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला आणि बैठकीला गेलो. तिथेही तोच विषय झाला. त्यामुळे मन अधिकच चिंताक्रांत झाले. घरी आल्यावर त्या विचारापायी जेवण जाईना. कसेबसे आटोपले आणि झोपी गेलो. कधीनाही ती पहाटे-पहाटे जाग आली. कधी उजाडते आणि बँकेत जातो असे झाले होते. सकाळचे सगळे आटोपून बँकेत पोहचलो. त्या मॅडमला एसएमएस दाखवला आणि ...
नकळत घटना लिहिण्याची सवय लागली. Unknowingly, I developed the habit of writing down events.