पहिली मंडोळी कशाची...ऽऽऽ... एवढी हौस पुरवा...ऽऽऽ... (बॅकग्राऊंड म्युझिक) पहिली वैष्णवी - तीने साडी घातलेली होती. डोक्यावर पदर, सावळी होती. आल्याआल्या सर्वांवर एक कटाक्ष टाकला आणि खाली बसली. आम्ही सगळे वरती. कुणी पलंगावर, कुणी खुर्ची-टेबलवर, कुणी शिलाई मशीनवर. जागा मिळेल तिथे बसलेले. नातं जवळचं असल्यामुळे घरातील सर्वच मंडळी उपस्थित होते. पोहे-चहा झाल्यावर. तीला बर्याच जणांनी बरेच प्रश्न विचारले. नंतर मला विचारणा झाली. “तुमचे शिक्षण काय झाले?” या प्रश्नावरच सभा तहकुब झाली. कारण घरच्यांना आधीच सांगितले होते. शिक्षण आणि एकांतात पंधरा मिनिटे बोलायला वेळ द्या. दुसरी वैष्णवी - यांचा फोटो, कुंडली न बघता डायरेक्ट भेटायला गेलो. घर सुंदर सजवले होते. कपाळावर कुंकु नसलेल्या त्या महिलेने स्वागत केले. आत प्रवेश केल्यावर हॉलमध्ये एक महिला उभ्या होत्या. त्या कदाचित त्यांच्या बहिण असाव्यात कारण चेहेरा मिळता जुळता होता. मुलीला आवाज देवून पाणी-चहा बोलावून घेतले. ज्यांनी स्वागत केले त्या मुलीच्या आई होत्या हे समजले. पाणी-चहा देवून ती आत निघून जायची. हॉलमध्ये थांबत नव्हती. कदाचित भिती किंवा आईच्या आ...
नकळत घटना लिहिण्याची सवय लागली. Unknowingly, I developed the habit of writing down events.