मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

when that naked woman held my hand लेबलसह पोस्ट दाखवत आहे

त्या नग्न स्त्रीने माझा हात धरला तेव्हा...

‘घनकर गल्लीत एक प्रिंटींग जॉब टाकू... घरी जाऊ... आणि डबा घेऊन जॉबवर निघून जाऊ.’ असं स्वतःशी पुटपुटत मी गाडी मेनरोडवरून रेडक्रॉसकडे टाकली. पहातो तर गाड्यांची ही भली मोठी रांग लागलेली. मी या गर्दीतून गाडी काढू कशी म्हणून गादी बंद केली आणि रस्त्याच्या कडेला भिंतीलगत उभा राहून गंम्मत पहात होतो. एम.जी.रोडवरून कसला तरी मोर्चा निघाला होता. म्हणून रविवार कारंजा वरून येणार्‍या गाड्या थांबवल्या असाव्यात असा निष्कर्ष मी काढला. कदाचित मोर्चामधील घोषणाबाजीमुळे गर्दीत गाड्यांचे आवाजही शांत झालेले होते. उभ्या राहिलेल्या प्रत्येक गाडी, व्यक्ती, परिसरातील घडामोडी भरभर बघत होतो. माझ्या समोरच असलेल्या भव्य दोन इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर कुटुंबातील मंडळी गर्दी करून मजा बघत होते. गर्दीमध्ये प्रत्येकाला घाई ही होतीच. केव्हा रस्ता मोकळा होईल याचीच वाट बघत होते. तेवढ्यात मी जिथे उभा होतो तिथल्याच पायवाटावरून ती नग्न बाई घाबरलेली आणि गोंधळलेल्या अवस्थेत झपाझप पावलं टाकीत माझ्या दिशेने येत असलेली पाहिली. गर्दीतील लोकांना मारण्यासाठी सारखी एक हात हवेत झटकत होती. दुसर्‍या हातात वाकलेली काठी टेकत होती. डोळे ...