मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चौकट राजा

टकुला घेऊन दादासाहेब सभागृहात पोचलो. पडदा बाजूला करून टकुला हळूहळू हॉलमध्ये नेले. अंधारात चाचपडत चालण्यापेक्षा दरवाजाच्या एका कोपर्‍यात त्याच्या खांद्यावर हात ठेवून थोडावेळ उभा राहिलो. कार्यक्रम चालू झालेला होता. मान्यवरांची भाषणे चालू होती. हॉल गतीमंद आणि मतिमंद मुलांनी आणि त्यांच्या बरोबर आलेल्या पालकांनी भरलेला होता. टकूच्या बाईंनी आम्हाला पाहून हाताने खुणावले. आम्ही दोघे हळूहळू करत त्या दिशेला गेलो. त्यांनी आमची जागा धरून ठेवली होती. टाळ्यांच्या कडकडाटात मान्यवरांचे भाषणं चालू होती. टकू टाळ्यांच्या आवाजाने हसत होता. त्याला खुर्चीवर बसवून स्टेजवर काय काय चालू आहे ते ते त्याच्या कानात सांगत होतो. राज्यातून विविध शाळांमधून विकलांग विद्यार्थ्यांची नाट्यस्पर्धा बघायला मिळणार होत्या. हळूहळू कार्यक्रम चांगला रंगात आलेला होता. भाषणं संपून नाट्य प्रयोग  सुरू झाली होती. एक प्रयोग झाला की हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि टकू खूप खूश व्हायचा. अगदी दात आवळून टाळ्या वाजवायचा. त्याच्याबरोबर मी पण जोरजोरात टाळ्या वाजवायचो. प्रत्येक नवीन प्रयोग सुरू झाला की त्याला माहिती सांगायचो. एका नाटक...