“तुम्ही कधीपासून खड्यांवर विश्वास ठेवायला लागले?” ज्योतिष कार्यालयामध्ये रिसेप्शन काऊंटरवर वहिनी बसल्या होत्या. त्यांनी माझा मिश्किल चेहेरा बघत प्रश्न विचारला. “परिस्थिती अशी काही पुढे आली आहे की, ज्यांनी-ज्यांनी जे-जे करायला सांगितले ते-ते करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. “हं... मला ह्यांनी थोडं सांगितले आहे. अहो.. एवढे निराश नका होऊ. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख आहेच की.” वहिनींनी शाब्दीक दिलासा देत माझी कुंडली पुस्तिका घेवून सरांच्या केबिनमध्ये गेल्या. वहिनी बाहेर येवोस्तर ज्योतिष कार्यालयाच्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती वाचत बसलो. पाठीला पाठ लावून बसलेल्या एका राशीला स्थिर झालो. “ती तुमच्या काही कामाची नाहीये.” वहिनींचे सर स्वतः बाहेर येऊन दमदार आवाजात मला म्हणाले. डोळ्यावरचा डे-नाईट चष्मा काढून “या बसा...” म्हणत त्यांनी मला न्याहाळले. त्यांचे ते काळेभोर केस, दाट काळ्या मिश्या, गुबगुबीत गोरे गाल, गळ्यात सोन्याची जाड चैन, पांढरे कपडे, मनगटात सोन्याचे ब्रेसलेट, दोन्ही हातांच्या बोटात मोठाले रत्न, एका हातात मोबाईल, दुसरा टेबलवर आणि दुसर्या हातात माझे फाटलेले कुं...
नकळत घटना लिहिण्याची सवय लागली. Unknowingly, I developed the habit of writing down events.