रात्र बरीच झाली होती. तरीही ऋतिकने मोठी गाडी काढली आणि आम्ही चौघेही घराबाहेर पडलो. (प्रियंकाने एक विडींग गिफ्ट ऑर्डर घेतली होती. त्या कामासाठी आम्ही चौघेही भिडलो होतो. शक्य तेवढे काम पूर्ण करून फायनल हात दुसर्या दिवशी द्यायचा ठरला. सगळेच थकून गेलो होतो. मग घरी जेवणा ऐवजी बाहेर खाण्याचा प्लॅन बनवला गेला.) मी प्रियंका आणि ऋतिकच्या व्यावसायिक गप्पा ऐकत होतो. या दोघांनी आर्ट अॅण्ड क्राफ्टचा व्यवसाय सुरू केला होता हे मला माहित होते. पण त्यांचे काम नेमके कसे चालते? त्यात काय काय करायचे असते? काय प्रोडक्ट आहे? हे मला जाणून घ्यायचे होते. मी याच गोष्टीसाठी समजून घेण्यासाठी गोव्याला आलो होतो. आज तिचे वर्करूम जेव्हा पहात होतो. आर्ट अॅण्ड क्राफ्टमधील एकही गोष्ट आजपर्यंत पाहिली नव्हती ती मी इथे बघत होतो. इतक्या सुंदर, मोहक आणि मन वेधून घेणार्या वस्तु होत्या. पेपर्स, कलर्स, लाकूड, लोखंड, कॉपरपासून अशा भरपूर वस्तू, गिफ्ट अजून कशा-कशापासून कायकाय तयार केले होते. बापरे... खरंच असे वाटत होते की ही दुनियाच खूप निराळी आहे. मनाने केलेली कल्पना ती प्रत्यक्षात समोर पहात होतो. असं वाटत होते की या कल्पनेतू...
“चल गं पटकन... तू खूप हळूहळू चालते. तुझ्यामुळे मला खूप उशीर होतो. तुला अक्का-आत्याबरोबर जायला काय होते? तो बघ भोंगा वाजायला लागला.” “अरे थांब अण्णा... माझे पाय खूप दुखताहेत. मी पडेनऽऽऽ.” तिने माझ्या खांद्यावर जो हात ठेवला होता त्याचा एक बोट खुब्यात रोवून कचकन खाली दाबला. मी “ईऽऽऽ... आई गं.” म्हणत तिचा हात झटकन झटकला. ती “अण्णाऽऽऽ, मी पडले...” म्हणत जमिनीवर कोसळली. खांदा चोळत “मला तुझा खूप राग येतोय. माझा शर्ट सगळा खराब करून टाकते. ऊठ लवकर. नाहीतर मी निघून जाईन...” स्टेशनरीच्या दुकानातून काका लगबगीने बाहेर आले. आत्याला आधार देत “मी तुम्हाला नेहमी पाहतो.” तिला उभे केले. “बघ किती थरथरतेय ती. तिचे पाय बघ” तिचे पाय वरून घासल्याने रक्त येत होते. काका मला दाखवत होते. “पोरी रडू नकोस...” काका माझ्याकडे बघत “तू जरा हळू चाल. तिला चालता येत नाहीये.” काकाकडे रागाने बघत आत्याच्या कोपरीला पकडले. खचकन ओढले नि तेथून निघालो. शाळेच्या गेटपाशी आणून तिचा हात अचानक सोडून दिला. आत्याने स्वतःला सावरत पटकन गेट पकडला. मी तिला न पाहता शाळेत निघून गेलो. प्रार्थना होऊन गेली होती. तिची गंमत बघावी म्हणून एका भिंतीलग...