रखरखत्या उन्हात आम्ही चौघे व्हिडिओ गल्लीत फिरत-फिरत एका निमुळत्या गल्लीत पटकन शिरलो. आम्हाला कुणी ओळखीच्यांनी पाहू नये म्हणून डोक्याला नाही पण तोंडाला रुमाल लावलेला होता. एक इसम “पाँच रुपये... पाँच रुपये... पाँच रुपये...” करत तिरप्या नजरेने भुवया वर करत आम्हाला खुणावत होता. घुंगराळे केस, एका कानावर दात कोरायची काडी, डोळ्यात सूरमा, तोंडात बारचा बोकणा, कानात बाळी, एका हातात रुमाल बांधलेला, शर्टाची बटणं उघडे, लोंबलेला बनियन, पायात स्लिपर खालून वाकडी तिकडी वळवलेली पॅन्ट असा सुकलेला एक इसम “चल आता क्या?... 15 मिनट का खेल है. माल एकदम गरम है.” आम्ही एकमेकांकडे बघत त्याला पैसे दिले. तो दुसर्या निमुळत्या गल्लीत घेऊन “ये खुर्सी लो, अंदर जाके बैठो. शो अब्बी चालू होएगा.” असे म्हणत तो काळवंडलेला पडदा खासकन बाजूला केला. आत काही लोकं बसलेली दिसली. जणू काही व्हॅम्पायरच दिसत होती. त्याने जसा पडदा खाली सोडला तसा काळाकुट्ट अंधार झाला. लख्ख प्रकाशातून एकदम अंधारात आल्याने काहीच दिसत नव्हते. धडपडत-चाचपडत कुठेतरी खुर्च्या मांडल्या. आमच्या पाठोपाठ काहीजण खुर्च्या घेऊन आमच्या पुढे येऊन बसल्या. त्या बंद खोली...
नकळत घटना लिहिण्याची सवय लागली. Unknowingly, I developed the habit of writing down events.