मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्टेटमेंट - संशय - विश्वास

पासबुक बघता बघता “मला चार दिवसात तीन महिन्याचे स्टेटमेंट पाहिजे.” पप्पा रागवून माझ्याशी बोलत होते. “अहो पप्पा, मला इतकं कसं काय लक्षात राहणार की पैसे कसे कसे खर्च केले म्हणून...” मी “का? तू डायरी मेंटेन करत नाही का?” “हो; करतो. पण त्यात खर्च कुठे लिहितो.” मी “ते काही सांगू नकोस. मागील एक महिन्याचा हिशोब पाहिजे म्हणजे पाहिजे” पप्पा आणखी रागावून बोलत होते. मी मान खाली घालून त्यांचे बोलणे ऐकत होतो. “मला वाटले होते की, तुम्हाला गॅरेजच्या बाहेर काढून सेविंगच्या बाबतीत काही शिकाल म्हणून. पण मी साफ चुकलो. इथे तर (पासबुक झटकत) खडखडाट आहे. बारा-पंधरा तास कामावर जाऊन तू करतो काय? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.” पप्पा गुडघ्यांचा आधार घेत उभे राहिले. आईकडे बघत “तुमच्या लाडक्याला काही जमत नसेल ना... तर बंद करा कामावर जाणं. गॅरेजवर परत या. काहीही होणार नाही यांच्याकडून.” पप्पा खूप चिडून बोलत होते. “आहो पप्पा, आत्ता कुठे गॅरेजमधून बाहेर पडून स्क्रीन प्रिंटिंग शिकलो, कॉम्प्युटर शिकलो, आता कुठे जॉब मिळाला आहे. ते करून परत तुमच्याबरोबर गॅरेजवर पण मदत करतो आहे.” मी “गप्प बस्सऽऽऽ... काही सांगू नकोस. मला एक...