मुख्य सामग्रीवर वगळा

निलम, गोमेद, ओपेल भाग 2

काढून ठेवलेले रत्न त्यांनी एका पाकिटात टाकत “ह्यांचा काय परिचय” हनुवुटीने इशारा करत दाजींकडे पाहिले. 
काकांच्या पटकन लक्षात यावे म्हणून दाजींनी त्या-त्या लोकांचा परिचय देवून माझे नाव त्या-त्या लोकांना लावले. नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि तेथून निघालो.
दाजींना घरी सोडून मीही निघालो. 
सांगितलेल्या दिवशी मी फोन करून त्यांच्या दुकानात गेलो.
“या बसा. तुमच्या अंगठ्या तयार होवून मंदिरात गेल्या आहेत.”
“अंगठी कोणत्या बोटात घालायची आहे माहिती आहे का?” असे म्हणत काकांनी मी दिलेला कागद परत केला.
मी ‘नाही’ म्हणून मान हलवली. कदाचित माझा पडलेला चेहेरा पाहून “बाळ, तू खुप दुःखी वाटत आहेस. काय झाले तुला? आणि या अंगठ्या का बनवतो आहे? ते म्हणाले.
मी त्यांना सांगायला सुरवात केली. तेवढ्यात तो व्यक्ती अंगठी घेवून आला. त्या डबीमध्ये छान गुलाबी रंगाचा मखमली कपड्यात दोन अंगठ्या ठेवल्या होत्या. काकांनी स्वतः त्या अंगठ्या माझ्या बोटात परिधान करून दिल्या. “घातल्या आहेस आता काढू नको.” असे सांगितले.
अंगठी इतकी सुंदर होती की, त्या परिधान केल्यावर मी राजा झालो आहे असे काही वाटत होते.
मी त्यांना लगेचच पैसे देवू केले आणि “धन्यवाद काका” म्हणत माझं बोलणं आवरतं घेतलं. पण त्यांनी लगेच माझा हात धरून खाली बसवले. 
“हे रत्न परिधान केल्याने कदाचित तुझ्या आयुष्यात खुप मोठे बदल होतीलही. पण एक लक्षात ठेव. आयुष्यभरासाठी काही कामाचे नसतात. ते पण दगडच आहेत. स्वतःचा आत्मविश्वास वाढव. हे बघ माझ्याही बोटात काहीही नाही. मी नास्तिक. देवाला मानत नाही. रत्नांवर घाव घातले. त्याला पैलू पाडले. सिद्ध करण्यासाठी त्यावर संस्कार करावे लागतात. म्हणून पूजा करवून घेतली. तसा तो विधीच आहे. पण मी मंदिरात नाही गेलो. माझी बायको आस्तिक. जाईल तिथे नारळ फोडेल.” (काका बोलत असतांना एकदम मधे थांबले. माझ्या चेहेर्‍याजवळ आले. त्यांनी माझा हात घट्ट धरला. मोठा श्वास घेत.) “हे बघ. उशा खाली साप असेल आणि तू त्याच जागी झोपायला गेला तर काय होईल?. तीन गोष्टी करता येईल. त्या खोलीत जाऊ नकोस. नाहीतर गादीसकट त्याला बाहेर फेकून दे. नाहीतर सापाला पकड आणि मारून टाक.”
हे बोलत असतांना काकांचे डोळे खूप मोठे झाले होते. त्यांच्या डोळ्यातील लाल रेषा स्पष्ट दिसत होत्या. त्यांच्या हाताचा स्पर्श गरम जाणवत होता. त्यांनी दिलेल्या उदाहरणात मी गुंतून गेलो होतो. त्यात खोली, साप, गादी कोण काही कळत नव्हते.
“असो... माझे सांगणे काम आहे. बाकी तू कर्ता आहेस. तू ठरव. निर्णय घेण्याची क्षमता वाढव. आणि खंबीरपणे उभा रहा. जा सगळंकाही ठिक होईल.” असे म्हणत त्यांनी माझा हात सोडला.
मी त्यांना नमस्कार करून निघालो. रत्न खुप चमकत होते. तेथून घरापर्यंतचा प्रवास रत्नांकडे बघतच झाला. पण मात्र लवकरच जमिनीवर आलो. अंगात तेच जुने कपडे, तुटलेली सँडल, पांढरे केस, डोक्यात नाना विचार, कर्ज, दवाखाना, भाड्याचे घर, भविष्य अंधारात, सगळा फाटका पसारा दिसला.
पण या सगळ्यांमध्ये एक उमेदीची किरण दिसली ती म्हणजे काकांचे शब्द ‘जा सगळं काही ठिक होईल’.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली. ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की. त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला. “ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.” क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता. वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.” डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कद...

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......