मुख्य सामग्रीवर वगळा

निवेदनाची पुरतता आणि प्रचिती

कसाबसा रेनकोटमधून फोन काढला नी कानाला लावला.
भाईं (काका) (टेन्शनमधे) - “अरे!, तु कुठे आहेसऽऽ?, गंगेला पुर आला आहे. अजुन कितीतरी क्युसीएस पाणी सोडणार आहे. घरात पाणी शिरणार आहे. तुझा कॉमप्युटर, सामान तसेच आहे. सगळे सामान हलवले आहे. तुझेच सामान हलवायचे बाकी आहे. लवकर घरी ये. तुझी सगळे वाट पाहत आहे.”
मी (दबलेल्या आवाजात) - “हो... आलो भाई. फोन कट.”
डोळ्यात टचकन पाणी आले. काय करावे समजत नव्हते. अशोक स्तंभावर एका कोपर्‍यात एकटाच हतबल होऊन उभा होतो. छिनबिन अवस्थेत जमीनीकडे एकटक लावून पहात होतो. फोन ठेवून त्याच ठिकाणी दोन्ही हात जोडले (मी एका व्यक्तीचे स्मरण केले. जागेवर निवेदन ठेवले). मुसळधार पाऊस थोडासा संतगतीने पडत होता. दुपारचे किती वाजले माहित नव्हते. माझा रेनकोट आतूनसुद्धा ओला होता. बोटं गोठून गेली, अंगात ताकत नव्हती, पोटात अन्नाचा कण नव्हता. तरी जड पाऊले उचलली आणि थेट शेखर काकांचे प्रेस गाठले.
मी - “सर, फाटे सरांनी जॉब कॅन्सल केला आहे. ते डिलिव्हरी घेणार नाही.”
काका (हैराण होऊन) - अरे, काय सांगतो तू हे! 1 लाखाची ऑर्डर आहे ती. म्हणजे सगळे पैसे, मेहनत पाण्यात जाणार. फाटे मॅडमशी प्रत्यक्ष बोल. त्यांना सांग. विनवणी कर. काही तरी सांग. असं करू नका म्हणावं.”
मी - “हं... मॅडम फोन घेत नाहीये. त्यांना कदाचित बोलायचे नाही.”
काका - “आता काय करणार आहेस?.”
मी - “मला काही सुचत नाही.”
काका - “कदाचित ते चेष्ट करीत असतील.”
मी (चिडून) - नाही हो..., तिकडे घरात पाणी शिरणार आहे. तीन दिवस झाले पाऊस थांबायचे नाव घेत नाही. गाडीवाले (मालवाहु)पावसामुळे गाडी काढायचे नाही म्हणतायेत. सकाळपासून मी गाडी शोधतोय. म्हणून मी अशोक स्तंभावर उभा होतो तेव्हाच मॅडमचा फोन आला, ‘जॉब आणू नकोस, तो तुझ्याकडेच ठेव. असे चिडून म्हणाल्या. यात कसली आली चेष्टा.”
काका - “थांब, चल आपण मॅडमकडे जाऊ, मी बोलतो मॅडमशी.”
मी - “अहं... मला आता घरी जाऊ द्या. मला सामान हलवायचे आहे. अजून जेवण नाही केले. जॉब कॅन्सल झालाच आहे. घरी नाही गेलो तर माझे कॉम्प्युटर, सामान सगळे पाण्यात जाईल.
काका - ठिक आहे. शांत हो. पाणी घे. घरी जा. आणि फोन कर मला. काही मदत लागली तर सांग.
प्रेसवरून गाडीला किक मारली आणि तडक घरी आलो. पाहातो तर गल्लीत लोकांची ही गर्दी. ट्रॅफीक जॅम, लोकं ओरडंत होती. सामान हलवायची सगळ्यांची लगबग, दुसरीकडे गोदावरीने रौद्र रूप घेतलेले. मी आपला शंडसारखा गाडी लावून घरात शिरलो. सामान बांधायला सुरवात केली. किचनच्या खिडकीकडे बाहेरून चार बोटं उरली होती घरात पाणी शिरायला. मी एकीकडे रडत सामान गोळा करत होतो. घरचे विचारत होते. का रडतो आहे?. काही झाले आहे का?. मी एक नाही की दोन नाही.
आणि चमत्कार व्हावा तसा एकदम पाऊसाचा आवाज बंद झाला. कडक उन पडले. सामान हलवून पूर्ण होते ना होते तोच फोन वाजला. नि लगेचच उचलला.
सोनाली मॅडम - “गठ्ठे बांधले असतील तर उद्या कुठल्याही परिस्थितीत गठ्ठे ऑफीसवर पोचते कर. हि शेवटची संधी आहे तुला. कारण मॅडमची गाडी पुरामुळे फसली आहे. मॅडम फॅक्टरीत जाऊ शकत नाहीये आज. तेव्हा लक्षात ठेव.” फोन कट.
फोन वरील मॅडमचे बोलणे ऐकता ऐकता मी किचनच्या खिडकीकडे पोहचलो तर पुराचे पाणी खाली गेले होते. आनंदाश्रु बाहेर आले. (कारण मी ठेवलेल्या निवेदनाची लागलीच पुरतता झाली होती.) ताबडतोब प्रेसवर फोन फिरवला. आणि झालेले संभाषण काकांना सांगितले. काका खुष झाले. घरच्यांनाही काय झाले. ते कथन केले व झालेला प्रकार समजला.
निवेदनाची पुरतता करणारा प्रत्यक्ष नाही दिसला. पण तो त्याचे काम कसे करून गेला काही समजले नाही. ही प्रचिती मिळाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली. ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की. त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला. “ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.” क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता. वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.” डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कद...

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......