मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नानी आत्या

मी भयानक स्वप्न बघून दचकलो आणि डोळे उघडले. त्या अंधारात म्हातारे विस्फारलेले केस, सुकलेला चेहेरा मोठे खोल गेलेले डोळे, लांब मोठे नाक, बारीक तोंड असलेला चेहेरा माझ्या चेहेर्‍या समोर होता. कपड्यात मुतावा असा वास माझ्या नाकाला झोंबला. पुरता घाबरलेल्या अवस्थेत ‘आजी’ करून मोठा आवाज दिला. आजी ताडकन झोपेतून उठून खरखर केलेल्या आवाजात ‘कायऽऽऽ रेऽऽ...’ करत माझ्या दिशेने बघितले. ‘मेली थेरडे...’ म्हणत आजीने हॉलमधला लाईट लावला. नानी आत्या माझ्या चेहेर्‍याला हात लावणार मी करंट लागल्यासारखा पटकन सरकलो. आजीने नानी आत्याचे खवाटे धरले तसे ओढत तीला तिच्या जागेवर नेऊन पटकवले. ‘हरामी साली; आता रात्रीच्या वेळी पोरांना घाबरवते काय... तुला आता बघते थांब...’ मी त्या दोघांची धांदल गुडघ्यात डोके घालत बघत होतो. तिरपी नजर करत घड्याळात रात्रीचे तीन वाजले होते. रात्रीतून नानी आत्या भोवती आजीने बॅरीकेटस्‌ लावले. ‘(नानी आत्या) तुला सकाळी बघते. (माझ्याकडे फिरून) काय रे... घाबरलास का?..., काय केलं तीनं तुला.’ मी (संभ्रमअवस्थेत) ‘अ... काही नाही, ती जवळ येऊन काय करत होती कायऽऽऽ माहित. (मधेच) तीने साड...

त्या नग्न स्त्रीने माझा हात धरला तेव्हा...

‘घनकर गल्लीत एक प्रिंटींग जॉब टाकू... घरी जाऊ... आणि डबा घेऊन जॉबवर निघून जाऊ.’ असं स्वतःशी पुटपुटत मी गाडी मेनरोडवरून रेडक्रॉसकडे टाकली. पहातो तर गाड्यांची ही भली मोठी रांग लागलेली. मी या गर्दीतून गाडी काढू कशी म्हणून गादी बंद केली आणि रस्त्याच्या कडेला भिंतीलगत उभा राहून गंम्मत पहात होतो. एम.जी.रोडवरून कसला तरी मोर्चा निघाला होता. म्हणून रविवार कारंजा वरून येणार्‍या गाड्या थांबवल्या असाव्यात असा निष्कर्ष मी काढला. कदाचित मोर्चामधील घोषणाबाजीमुळे गर्दीत गाड्यांचे आवाजही शांत झालेले होते. उभ्या राहिलेल्या प्रत्येक गाडी, व्यक्ती, परिसरातील घडामोडी भरभर बघत होतो. माझ्या समोरच असलेल्या भव्य दोन इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर कुटुंबातील मंडळी गर्दी करून मजा बघत होते. गर्दीमध्ये प्रत्येकाला घाई ही होतीच. केव्हा रस्ता मोकळा होईल याचीच वाट बघत होते. तेवढ्यात मी जिथे उभा होतो तिथल्याच पायवाटावरून ती नग्न बाई घाबरलेली आणि गोंधळलेल्या अवस्थेत झपाझप पावलं टाकीत माझ्या दिशेने येत असलेली पाहिली. गर्दीतील लोकांना मारण्यासाठी सारखी एक हात हवेत झटकत होती. दुसर्‍या हातात वाकलेली काठी टेकत होती. डोळे ...

रक्तबंबाळलेला चेहेरा

धाडकन आवाज झाल्याने रात्रीचा किरर्र आवाज थोडावेळ शांत झाला. त्या चौघा-पाच जणांनी रावसाहेबांकडे धाव घेतली. मीही माझी गाडी बाजुला उभी करून साहेबांकडे धावलो. रस्त्यावरच्या चिखलपाण्यात राव पालथे पडले होते. रक्तबंबाळलेला चेहेरा पाहून छातीत धडधड सुरू झाली. त्यांचा चेहेरा, अंगावरचे कपडे रक्ता-चिखलाने माखलेले होते. बघणारे लोकं हळूहळू आवाजात बरे-वाईट पुटपुटत होती. साहेबांना सावरायला मी एकटाच होतो.... समारंभ आटोपून आम्ही पाचही एकच्या सुमारास बाहेर पडलो होतो. त्या शुकशुकाटात आमच्या गाड्या भरधाव वेगाने वेगवेगळ्या दिशांना फिरल्या आणि रावसाहेबांच्या बाबतीत असे घडले. त्यात त्यांचा फोन आपटल्याने कोणाशीच संपर्क होणार नव्हता. मिनमिनत्या प्रकाशात रावसाहेबांचं सामान कुठे काय पडलेलं होतं काही समजलं नाही. मी हतबल होतो. ‘कुणीतरी रिक्षा बोलावता का..., मदत करा माझी...’ मी लोकांवर अक्षरशः रेकुन अखेर बोललो. साहेबांच्या गालात मारत शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होतो. ते कुठल्याच हाकेला साथ देत नव्हते. एका डोळ्याच्या वर जबर मार बसल्याने रक्त खूप वहात होते. तेवढ्यात रिक्षा उभी करून त्या भल्या व्यक्तीने मला घाई ...

प्रारब्ध

असेच एका रात्री मी आणि अण्णा फेरफटका मारण्यासाठी गंगेवर निघालो. कुठे जावं ? म्हणून रामवाडी पुलामार्गे जाण्यास निघालो. आमच्या शेजारून गोदावरीचे पाणी संथ गतीने वाहत होते. पाय वाटेवर लोकांची वर्दळ तशी कमी होती. बारमध्ये जसे मिणमिणते दिवे असते तसे महापालिकेच्या दिव्यांचा प्रकाश पडलेला होता. रात्र किररं करत होती. नदी काठचे बेडकं गळा फुगवत बोंबा ठोकीत होती. पुलावरून एखाददोन गाड्यांचे आवाज येत होते. वार्‍याचा पत्ताच नव्हता आणि आम्ही दोन भुतं त्या रस्त्याने मस्त गप्पा मारत चाललो होतो. अधनं-मधनं एखाददोन डोकी दिसली नंतर कुत्रे सोडून कुणी एक दिसत नव्हतं. रामवाडी पुलापर्यंत पोहचलो. आमच्या गप्पा रंगत किती वेळ झाला याचे भान दोघांना नव्हते. मी आणि अण्णा परतीला पायी चालायला सुरूवात केली. गंमतीदार विषय चालु असतांना आण्णाचे लक्ष नदीकाठच्या कठड्यावर गेले आणि त्या दिशेला तो भरभर चालून कठड्यावरील ती चमकलेली वस्तु घेतली. मी आपला कुतुहलाने पुढे सरकलो. पाहिलं तर अण्णाला चष्मा सापडला होता. अण्णाचे पुढचे प्लॅन सुरू झाले. ‘‘चला... आणखी एक फ्रेम झाली, पुढील दोन वर्षे काही टेंन्शन नाही. उद्याच जाऊन काच बसवून...

‘‘शांती बाजारात गेलीय’’

- आईने आजीला सांगितले. सकाळचा पहिला आवाज एैकत मी उठलो. ‘‘राजा, दूधाची पिशवी आणि पेपर घेऊन ये जा पटकन.’’ आईने मला सांगून सडा-रांगोळी करण्यासाठी निघून गेली. मी आपला आळस देत उठलो. दूध डेअरीत आलो. डेअरीवाला आलेला नव्हाता, म्हणून तेथे उभा होतो. डेअरीसमोर बालाजी मंदिर आहे. तेथे सकाळच्या मोठ्या ककर्श आवाजात माईकवर कीर्तन चालू होते. त्याच्याच शेजारी साई मंदिरातील डीजे साऊंडमध्ये काकड आरती चालू होती. डेअरीच्या मागे शंकाराचे मंदिर आहे. तेथे अभिषेक चालू होता. तेवढ्यात आमचा डेअरीवाला भाऊ आला. एका हातात किटली, दुसर्‍या हातात मोबाईल, कानात हेडफोन. ते काढताच बारीक आवाज माझ्या कानावर पडला. ’ये है ९....एफएम, ईटस् हॉट’. मी दूध घेऊन घरी आलो. जोरजोरात घंटीचा आवाज आला. आजीची देवांना आंघोळ घालायला सुरूवात झाली. दूध दिले आणि मी अंघोळीला निघून गेलो. ‘‘राजा; मुकेश साहेबांचा पेपर आपल्याकडे आलाय. तो त्यांना देऊन ये.’’ आई बोलली. मी आपलं आवारलं आणि पेपर द्यायला निघालो. आमच्या शेजारीच मुकेश सराचे ऑफीस असल्याने पटकन निघालो. तेवढ्यात गॅसवाल्याने घरासमोर त्याची ती बरीच आवाज करणारी गाडी लावली. अनं त्यातलं सिलें...

कलियुग

सद्गुरूचरित्रात २ र्‍या अध्यायात कलियुगाचे दर्शन झाले. आणि आज गंगापूर रोडला एका आईस्क्रीमच्या दुकानात आईस्क्रीम खात असतांना जे दृष्य पाहिले तेव्हा. माझे आत्ताचे वय ३१ आहे. असे चाळे उघड्यावर करायला आजुनही माझे मन कचरतं. पण २०/२२ वयाचे तरूण-तरूणी असतील. ते मला बघुन अजिबात घाबरत नव्हते. त्यांच्यापैकी एक जोडपं त्यांच्या नजरेने मला जणुकाही सांगत होतं ‘तु पण असं कर’. आपल्याला चार भिंतीमध्ये जो ‘विषय’ उपभोगायला दिला आहे. तो ‘विषय’ ते खुलेआम करीत होते, एवढा ‘विषय’ त्यांच्यामध्ये प्रबळ झाला होता. मी ते दृष्य पाहिले. आईस्क्रीम कशी-बशी संपवली आणि बाहेर पडलो. डोकं गरम झालं होतं. मोबाईल काढला आणि माझ्या मित्राला ङ्गोन केला. झाला विषय सगळा सांगितला आणि थोडावेळ शांत झालो. पण मनात ती गोष्ट घर करून बसली होती. एवढी-एवढीशी पोरं आज इतके बिनधास्त झाले की लहान-मोठ्यांचे भान राहीले नाही. यांची आताची कर्म अशी आहेत तर त्यांची पुढची पिढी किती किळसवाणी जन्माला येईल. याचा विचार त्या मुलांनी कसा केला नाही ? त्यांच्या आई-वडीलांनी यांना असे वार्‍यावर कसे सोडले ? प्रत्यक्ष श्वास ज्याच्या आधारावर घेत आहेत. त्...