कल्पना योगायोगाने बँकेत भेटली. बँकेचा लंचब्रेक असल्याने आम्ही दोघेही एका बाकावर बसून घेतले. तिच्या पायामुळे ती खूपच दमलेली होती आणि डोळेसुद्धा पाणावलेले होते. मीही ‘काय झाले म्हणून लगेचच विचारले’ थोडावेळ गेला आणि ती बोलायला सुरू झाली. ती तिच्या मुलांना प्लेग्रुपला सोडवायला गेली होती. एका रिक्षावाल्या विषयी ती सांगत होती. “रिक्षावाल्याने मला प्लेग्रुपपाशी सोडले. त्याने रिक्षातून वाकून पाळणा घराची पाटी पाहिली आणि ‘तुमचे मुलं इथे का ठेवता?’ म्हणून विचारले. ‘मी त्या रिक्षावाल्याला, माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला मला काय त्रास झाला. दोन पोरं झाली, त्यात माझा एक पाय कापावा लागला, सासूबाई वारल्या. त्यात हॉस्पिटलचा खर्च, ऑपरेशनसाठी लोकांकडून पैसे उचलले, पोरांना बघायला कुणी नाही... ते दिवस कसेबसे काढले. आता लोकांची देणी द्यायची आहे. नवर्याच्या पगारावर काय काय करणार म्हणून मीही आता जॉब करते आहे. पोरं थोडी मोठी झाली. त्यांना समज आली आहे. म्हणून पोरांना इथे ठेवून जावे लागत आहे. असं मी त्याला सांगत होते.’ रिक्षावाला रिक्षाच्या बाहेर येऊन उभा राहिला, “अहो, बघा ना! देव कशी प्रत्येकाची परीक्षा घे...
नकळत घटना लिहिण्याची सवय लागली. Unknowingly, I developed the habit of writing down events.