मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ब्लू फिल्म आणि 20 रुपयाची चप्पल

रखरखत्या उन्हात आम्ही चौघे व्हिडिओ गल्लीत फिरत-फिरत एका निमुळत्या गल्लीत पटकन शिरलो. आम्हाला कुणी ओळखीच्यांनी पाहू नये म्हणून डोक्याला नाही पण तोंडाला रुमाल लावलेला होता. एक इसम “पाँच रुपये... पाँच रुपये... पाँच रुपये...” करत तिरप्या नजरेने भुवया वर करत आम्हाला खुणावत होता. घुंगराळे केस, एका कानावर दात कोरायची काडी, डोळ्यात सूरमा, तोंडात बारचा बोकणा, कानात बाळी, एका हातात रुमाल बांधलेला, शर्टाची बटणं उघडे, लोंबलेला बनियन, पायात स्लिपर खालून वाकडी तिकडी वळवलेली पॅन्ट असा सुकलेला एक इसम “चल आता क्या?... 15 मिनट का खेल है. माल एकदम गरम है.” आम्ही एकमेकांकडे बघत त्याला पैसे दिले. तो दुसर्‍या निमुळत्या गल्लीत घेऊन “ये खुर्सी लो, अंदर जाके बैठो. शो अब्बी चालू होएगा.” असे म्हणत तो काळवंडलेला पडदा खासकन बाजूला केला. आत काही लोकं बसलेली दिसली. जणू काही व्हॅम्पायरच दिसत होती. त्याने जसा पडदा खाली सोडला तसा काळाकुट्ट अंधार झाला. लख्ख प्रकाशातून एकदम अंधारात आल्याने काहीच दिसत नव्हते. धडपडत-चाचपडत कुठेतरी खुर्च्या मांडल्या. आमच्या पाठोपाठ काहीजण खुर्च्या घेऊन आमच्या पुढे येऊन बसल्या. त्या बंद खोली...

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

ग्रहण

सकाळची कामे आटोपून आम्ही तिघे जेवायला बसलो होतो. तेवढ्यात आईचा फोन आला, ‘आज ग्रहण आहे तुम्ही सकाळीच जेवून घ्या. या वेळेनंतर काहीही खाऊ नका. संध्याकाळी ग्रहण संपल्यावर अंघोळ करा. देवपूजा झाली की, मग जेवायला बसा.’ असे तिने सांगितले. आम्ही असे कधी केले नव्हते पण ठरवले की, सांगितल्याप्रमाणे करू. प्रयत्न करायला काय हरकत आहे. जेवण झाल्यावर ड्युटीवर निघून गेलो. दुपारी जेवणासाठी आम्ही ऑफीसमधील मंडळी एकत्र आलो. मी ‘डबा का नाही आणला?’ याचे कारण सांगितल्यावर त्यांनी ग्रहणाचा विषय लावून धरला. प्रश्नांचा नुसता भडिमार सुरू झाला. असे कुठे असते का भाऊ कलियुग चालू झाले? पृथ्वीवरील व्यवहार काही थांबणार आहे का? खाल्लं-पिल्लं तर काहीही होत नाही? आजपर्यंत कुणाचे काही वाकडे झाले का? तुला लई पथ्य-पाणी बाबा!, मी बघ 60 वर्ष पूर्ण झाली आजपर्यंत नाही ग्रहांची ना ग्रहणाची बाधा असं जगायचं असतं खाओ-पिओ मौज करो? वगैरे-वगैरे... सगळ्यांचं ऐकून झाल्यावर मी गच्चीवर निघून गेलो. ग्रहणाविषयी विचार करत राहिलो, आपण असे कधी ‘धरणं, सोडणं, पाळणं’ केले नाही. पण आज असे का जागृत झालो? मनात एकच विचार होता की, आईने सांगितले म्हणून. ...

दिल्ली

खूप दिवसांचा रखडत चाललेला प्लान अखेर मुहूर्त लागून ठरला. आणि दिल्लीला पोचलो. सुरुवातीला अजिबात वाटत नव्हते की, दिल्लीत आलो आहे म्हणून. त्यापेक्षा मुंबई तरी बरी असे वाटत होते. आल्या-आल्या अशी प्रतिक्रिया का व्यक्त करावी! कदाचित; स्टेशनपासून ते हॉटेलपर्यंतच्या प्रवासात जे दृष्य गाडीच्या खिडकीतून बघत होतो त्यामुळे असावे. ‘दिल्ली ते गल्ली’ ही म्हण आहे की, केवळ एक डायलॉग आहे माहीत नाही पण; दिल्लीतील प्रत्येक गल्ली न्याहाळत होतो. संपूर्ण प्रवास दिल्लीत काय बघण्यासारखे आहे हे बघण्यातच घालवत होतो. वातावरण तसे बर्‍यापैकी चांगले होते. पण जस-जसा दिल्लीच्या पोटात शिरत होतो. तस-तसा दिल्लीच्या आकाशात धुसर भाग स्पष्ट दिसत होता. हे इतके कटाक्षाने बघत होतो की, एका जाणकाराने सांगितले की, हे प्रदूषण आहे. ज्यात दिल्ली श्वास घेत आहे. पोटात गोळा आला. दिल्लीला यूपी, हरियाणा, उत्तराखंड असे काही राज्य लागून आहेत. त्यामुळे लोक नेमके कोणते हिंदी बोलत होते काही कळत नव्हते. दिल्लीतील खाण्याचे शौकीनपण क्या खूब है! कशात काय टाकतील आणि काय वाढून देतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे पोटाचे आणि जिभेचे नियम काही दिवस बा...

‘आई-वडील’ आणि ‘सोयरे’

कल्पना योगायोगाने बँकेत भेटली. बँकेचा लंचब्रेक असल्याने आम्ही दोघेही एका बाकावर बसून घेतले. तिच्या पायामुळे ती खूपच दमलेली होती आणि डोळेसुद्धा पाणावलेले होते. मीही ‘काय झाले म्हणून लगेचच विचारले’ थोडावेळ गेला आणि ती बोलायला सुरू झाली. ती तिच्या मुलांना प्लेग्रुपला सोडवायला गेली होती. एका रिक्षावाल्या विषयी ती सांगत होती.  “रिक्षावाल्याने मला प्लेग्रुपपाशी सोडले. त्याने रिक्षातून वाकून पाळणा घराची पाटी पाहिली आणि ‘तुमचे मुलं इथे का ठेवता?’ म्हणून विचारले. ‘मी त्या रिक्षावाल्याला, माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला मला काय त्रास झाला. दोन पोरं झाली, त्यात माझा एक पाय कापावा लागला, सासूबाई वारल्या. त्यात हॉस्पिटलचा खर्च, ऑपरेशनसाठी लोकांकडून पैसे उचलले, पोरांना बघायला कुणी नाही... ते दिवस कसेबसे काढले. आता लोकांची देणी द्यायची आहे. नवर्‍याच्या पगारावर काय काय करणार म्हणून मीही आता जॉब करते आहे. पोरं थोडी मोठी झाली. त्यांना समज आली आहे. म्हणून पोरांना इथे ठेवून जावे लागत आहे. असं मी त्याला सांगत होते.’ रिक्षावाला रिक्षाच्या बाहेर येऊन उभा राहिला, “अहो, बघा ना! देव कशी प्रत्येकाची परीक्षा घे...

डॉ ब्रॅण्डी

टकू खूप चिडचिड करतो, त्रास देतो, लवकर झोपत नाही. जसजसा मोठा होत चाललेला होता तसतसा त्याचा जास्त त्रास होत होता. आमच्याही दोघांची सारखी चिडचिड होत असे. एका भल्या माणसाने आम्हाला डॉ ब्रॅण्डीचा उपाय सांगितला. आता सांगितल्याप्रमाणे दोन आठवड्यातून एकदा एक चमचा औषध पोर्‍याला द्यायचे आणि उरलेले आम्ही दोघांनी घ्यायचे म्हणून दुकानातून एक छोटी बाटली घेऊन घरी आलो. त्या रात्री मस्त दोन काचेचे ग्लास काढले. बायको म्हणाली “अ..हं.. तिघांनीही एक-एक चमचा घेवू. एकखट्टी संपवायची नाहीये ती. ते ग्लास ठेवून द्या आणि जेवायला बसा”. मी मिश्किलपणे बाटलीला पाहिले, ‘एक-एक चमचा छ्या... च्यामारी ओठाला लावायची की पोटाला काही कळतच नाही राव... “आता नको. नंतर बघू केव्हा तरी...” असं म्हणत बाटली फ्रिजमध्ये ठेवून दिली. बायको चिडून “आला तुम्हाला राग. जशी कायी बाटली त्याला नाही तुमच्यासाठीच आणलीय.” मनात विचार आला ‘रात्री गुपचुप पिऊन संपून टाकू एकदाची. तुलाही नको नि त्यालाही नको.’ असं म्हणत झोपी गेलो.  ***  दोन-तीन दिवसांनी परत ती बाटली काढून बाहेर ठेवली. म्हंटलं नोर्मलला आली की रात्री तिला आणि मला दोन-दोन पेक करू आण...

निर्णय (Decision)

“तुम्हाला काही समजले का?” अजय “म्हणजेऽऽ?, तुम्ही नेमके कशाबद्दल बोलताहेत?” मॅकी “मला पंडित सरांचा फोन आला होता. आशा... हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे. त्या मुंबईला आहेत.” अजय “अहोऽऽ... काय सांगताय! मी आत्ता काही दिवसापूर्वीच तिला फोन केला होता. पण तिचा फोन अभिमन्यूने घेतला होता. सांगत होता की, ‘रूटीन चेकअपसाठी दवाखान्यात आलो आहोत. ती आतमध्ये आहे. मी तिला फोन करायला सांगतो’ म्हणून. त्याच्यानंतर काही फोन नाही. का? काय झाले त्यांना?” मॅकीने घाबरूनच विचारले. “अं... बातमी तशी एक चांगली आहे आणि एक वाईट आहे. त्यांना दोन जुळी मुलं झाली आहेत आणि दुसरी म्हणजे त्यांचा एक पाय कापावा लागला.” मॅकीने मोठा श्वास भरला आणि रिसिर्व्हरवरच ‘बापरेऽ’ करत सोडला. अजय थोडा थांबून “आताऽऽ... पाय का कापवा लागला ते एवढं नीटसं कळलं नाही पण; तुम्ही त्यांना फोन जरूर करा. ते तुमच्या फोनची वाट बघत असतील.” टु...उक, टु...उक, टु...उक फोन वाजत राहिला. मॅकीचे डोळे भरून आले होते. हाताला घाम येत होता. फोन ठेवून तो पॅन्टला सतत हात पुसत होता. नंतर अश्रू अनावर झाल्याने हुंदके देत रडत होता. तिच्याबाबतीत असे का घडले?... मॅकीचे काम असल्य...

संडास

“सर मला खालच्या जागी काय झाले आहे काही समजत नाही. मला असह्य वेदना होत आहे.” कुलकर्णी सरांनी नाकाच्या टोकावर ठेवलेल्या चष्म्यावरून माझ्याकडे बघत “बघू बरं... पॅन्ट काढ. झोप तिथे” असे म्हटल्याबरोबर त्या असिस्टंट डॉक्टरने पडदा बाजूला करत काहीतरी तयारी करायला घेतली. हे असे उघडे करून दाखवण्याची माझी पहिलीच वेळ. लाजंकाजं पॅन्ट काढत एकाकानावर झोपलो. ढुंगण ताणून “अरे तुला फिशर आहे!” असे म्हणत सरांनी खपकन गुदद्वारात बोट घातले. मी “अइय्यो” करत विव्हळलो. आणि भसकन बोट ओढून बाहेर काढले. उघड्या ढुंगणावर चापट मारत “उठ झालं...” असे म्हणत सर खुर्चीवर बसले. मी इज्जत गेल्यासारखे शर्ट खाली केला आणि उठून बसलो. असिस्टंट डॉक्टर माझ्या त्या जागेकडे बघुन अर्धे झोपलेल्या डोळ्यागत गंभीर चेहरा करून मिश्किलपणे पहात होता. पॅन्ट घालून सरांसमोर जाऊन बसलो. “सर हे फिशर काय असते?” कन्हणत प्रश्न केला. “अं... काही नाही... आता त्याचा विचार करू नको. या गोळ्या घे. आठ दिवसांनी दाखव.” भराभर औषधे लिहून माझ्या हातात कागद टेकवला. माझी ती जागा दुखतही होती आणि गारगारही वाटत होती. त्या जागी काय झालं?, काय केलं? कसं विचारू? समजत नव्हत...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 2

पहिली मंडोळी कशाची...ऽऽऽ... एवढी हौस पुरवा...ऽऽऽ... (बॅकग्राऊंड म्युझिक) पहिली वैष्णवी - तीने साडी घातलेली होती. डोक्यावर पदर, सावळी होती. आल्याआल्या सर्वांवर एक कटाक्ष टाकला आणि खाली बसली. आम्ही सगळे वरती. कुणी पलंगावर, कुणी खुर्ची-टेबलवर, कुणी शिलाई मशीनवर. जागा मिळेल तिथे बसलेले. नातं जवळचं असल्यामुळे घरातील सर्वच मंडळी उपस्थित होते. पोहे-चहा झाल्यावर. तीला बर्‍याच जणांनी बरेच प्रश्न विचारले. नंतर मला विचारणा झाली. “तुमचे शिक्षण काय झाले?” या प्रश्नावरच सभा तहकुब झाली. कारण घरच्यांना आधीच सांगितले होते. शिक्षण आणि एकांतात पंधरा मिनिटे बोलायला वेळ द्या. दुसरी वैष्णवी - यांचा फोटो, कुंडली न बघता डायरेक्ट भेटायला गेलो. घर सुंदर सजवले होते. कपाळावर कुंकु नसलेल्या त्या महिलेने स्वागत केले. आत प्रवेश केल्यावर हॉलमध्ये एक महिला उभ्या होत्या. त्या कदाचित त्यांच्या बहिण असाव्यात कारण चेहेरा मिळता जुळता होता.  मुलीला आवाज देवून पाणी-चहा बोलावून घेतले. ज्यांनी स्वागत केले त्या मुलीच्या आई होत्या हे समजले. पाणी-चहा देवून ती आत निघून जायची. हॉलमध्ये थांबत नव्हती. कदाचित भिती किंवा आईच्या आ...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......