“चल गं पटकन... तू खूप हळूहळू चालते. तुझ्यामुळे मला खूप उशीर होतो. तुला अक्का-आत्याबरोबर जायला काय होते? तो बघ भोंगा वाजायला लागला.” “अरे थांब अण्णा... माझे पाय खूप दुखताहेत. मी पडेनऽऽऽ.” तिने माझ्या खांद्यावर जो हात ठेवला होता त्याचा एक बोट खुब्यात रोवून कचकन खाली दाबला. मी “ईऽऽऽ... आई गं.” म्हणत तिचा हात झटकन झटकला. ती “अण्णाऽऽऽ, मी पडले...” म्हणत जमिनीवर कोसळली. खांदा चोळत “मला तुझा खूप राग येतोय. माझा शर्ट सगळा खराब करून टाकते. ऊठ लवकर. नाहीतर मी निघून जाईन...” स्टेशनरीच्या दुकानातून काका लगबगीने बाहेर आले. आत्याला आधार देत “मी तुम्हाला नेहमी पाहतो.” तिला उभे केले. “बघ किती थरथरतेय ती. तिचे पाय बघ” तिचे पाय वरून घासल्याने रक्त येत होते. काका मला दाखवत होते. “पोरी रडू नकोस...” काका माझ्याकडे बघत “तू जरा हळू चाल. तिला चालता येत नाहीये.” काकाकडे रागाने बघत आत्याच्या कोपरीला पकडले. खचकन ओढले नि तेथून निघालो. शाळेच्या गेटपाशी आणून तिचा हात अचानक सोडून दिला. आत्याने स्वतःला सावरत पटकन गेट पकडला. मी तिला न पाहता शाळेत निघून गेलो. प्रार्थना होऊन गेली होती. तिची गंमत बघावी म्हणून एका भिंतीलग...
नकळत घटना लिहिण्याची सवय लागली. Unknowingly, I developed the habit of writing down events.