मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डबक्यातलं बेडूक

रात्र बरीच झाली होती. तरीही ऋतिकने मोठी गाडी काढली आणि आम्ही चौघेही घराबाहेर पडलो. (प्रियंकाने एक विडींग गिफ्ट ऑर्डर घेतली होती. त्या कामासाठी आम्ही चौघेही भिडलो होतो. शक्य तेवढे काम पूर्ण करून फायनल हात दुसर्‍या दिवशी द्यायचा ठरला. सगळेच थकून गेलो होतो. मग घरी जेवणा ऐवजी बाहेर खाण्याचा प्लॅन बनवला गेला.) मी प्रियंका आणि ऋतिकच्या व्यावसायिक गप्पा ऐकत होतो. या दोघांनी आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्टचा व्यवसाय सुरू केला होता हे मला माहित होते. पण त्यांचे काम नेमके कसे चालते? त्यात काय काय करायचे असते? काय प्रोडक्ट आहे? हे मला जाणून घ्यायचे होते. मी याच गोष्टीसाठी समजून घेण्यासाठी गोव्याला आलो होतो. आज तिचे वर्करूम जेव्हा पहात होतो. आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्टमधील एकही गोष्ट आजपर्यंत पाहिली नव्हती ती मी इथे बघत होतो. इतक्या सुंदर, मोहक आणि मन वेधून घेणार्‍या वस्तु होत्या. पेपर्स, कलर्स, लाकूड, लोखंड, कॉपरपासून अशा भरपूर वस्तू, गिफ्ट अजून कशा-कशापासून कायकाय तयार केले होते. बापरे... खरंच असे वाटत होते की ही दुनियाच खूप निराळी आहे. मनाने केलेली कल्पना ती प्रत्यक्षात समोर पहात होतो. असं वाटत होते की या कल्पनेतू...

अपराधी

“चल गं पटकन... तू खूप हळूहळू चालते. तुझ्यामुळे मला खूप उशीर होतो. तुला अक्का-आत्याबरोबर जायला काय होते? तो बघ भोंगा वाजायला लागला.” “अरे थांब अण्णा... माझे पाय खूप दुखताहेत. मी पडेनऽऽऽ.” तिने माझ्या खांद्यावर जो हात ठेवला होता त्याचा एक बोट खुब्यात रोवून कचकन खाली दाबला. मी “ईऽऽऽ... आई गं.” म्हणत तिचा हात झटकन झटकला. ती “अण्णाऽऽऽ, मी पडले...” म्हणत जमिनीवर कोसळली. खांदा चोळत “मला तुझा खूप राग येतोय. माझा शर्ट सगळा खराब करून टाकते. ऊठ लवकर. नाहीतर मी निघून जाईन...” स्टेशनरीच्या दुकानातून काका लगबगीने बाहेर आले. आत्याला आधार देत “मी तुम्हाला नेहमी पाहतो.” तिला उभे केले. “बघ किती थरथरतेय ती. तिचे पाय बघ” तिचे पाय वरून घासल्याने रक्त येत होते. काका मला दाखवत होते. “पोरी रडू नकोस...” काका माझ्याकडे बघत “तू जरा हळू चाल. तिला चालता येत नाहीये.” काकाकडे रागाने बघत आत्याच्या कोपरीला पकडले. खचकन ओढले नि तेथून निघालो. शाळेच्या गेटपाशी आणून तिचा हात अचानक सोडून दिला. आत्याने स्वतःला सावरत पटकन गेट पकडला. मी तिला न पाहता शाळेत निघून गेलो. प्रार्थना होऊन गेली होती. तिची गंमत बघावी म्हणून एका भिंतीलग...

मौत

डोळे चोळत झोपेतून उठून बसलो (फोन कानाला लावत) “काय रेऽऽऽ” रेकलेल्या म्हशीसारखा आवाज काढत “आपल्याला मौतीला जायचं आहे.” रावसाहेब “कुणाच्या” “महेशच्या म्हातार्‍याच्या” रावसाहेब “कधी” “अख्खी माहिती फोनवरच विचारून घे. लवकर उठ. त्या अण्णाला फोन कर. दोघेही स्टँडवर येऊन उभे रहा. मी निघालो.” फोन कट... मिचमिचे डोळे करून खिडकीच्या बाहेर नजर टाकत अण्णाला फोन लावला. पाऊसाची रिपरिप चालू होती. वातावरण चांगलेच थंडगार झाले होते. घड्याळाकडे पहात अण्णाला रावसाहेबाचा निरोप दिला. सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघे स्टँडवर येऊन त्याची वाट पहात गप्पा मारत होतो. रिमझिम पावसात सायलेन्सरचा पुटपुटलेला आवाज करत रावसाहेबाची गाडी आमच्यासमोर येऊन उभी राहिली. रावसाहेबाची उंची कमी असल्याने रेनकोटमध्ये रावसाहेब झाकून गेलेला होता. पावसाच्या पाण्यात पानाचा तोबरा थुंकत गाडीवरून पुढे सरकला. आम्ही दोघे एकमेकांकडे बघत त्याच्या पाठीमागे गाडीवर बसलो. दोन बोटात माणिकचंदच्या पुड्या धरून हवेत हात झटकले. “आत्ता खाऊ नका. मामाची मिसळ खाऊन झाल्यावर खा.” सक्त ताकीत देत गाडीचे एक्सलेटर पिळले. पुटपुट करत गाडी हसणापूरला निघाली. शहर सोडून गावाक...

बलजितचा वाडा

संध्याकाळ व्हायला आली होती. आम्ही तिघे घर शोधता-शोधता अशोकास्तुपवर एका छोट्या बोळीत घुसलो. गाडी एका ठिकाणी पार्क करून पुढे पायी निघालो. दिवसभर फिरून तिघेही खूप थकलो होतो. उन्हाने अंगाचे पाणी-पाणी झाले होते पण घराचा मार्ग काही निघत नव्हता. एका बंद वाड्याला कुलूप दिसले. म्हटलं शेवटचा प्रयत्न करू. “कोण पाहिजे तुम्हाला?” शेजारच्या ताई संध्याकाळची दिवाबत्ती करत असतांना त्यांनी आम्हाला पाहिले. त्यांच्याकडे वाड्याची चौकशी केली असता त्यांनी अशोकास्तुपवरच एका गॅरेजवाल्या सिंग नावाच्या व्यक्तीकडे जायला सांगितले. वेळ न घालवता दोघांना तिथेच उभे करून गॅरेजवर पोहोचलो. “अच्छा... अच्छा... तो भूत बंगला! आधीच पडायला झाला आहे. कशाला तिथे जाताय?... ठीक आहे. हा नंबर घ्या. त्यांच्याशी बोलून घ्या.” असे बोलून तो गॅरेजमध्ये निघून गेला. त्या व्यक्तीचे बोलणे जरा खटकलेच. पण गरज होती. दिलेल्या नंबरवर पटकन फोन केला. त्याच्याशी बोलता-बोलता वाड्यापाशी येऊ लागलो. “तो पाच मिनिटात येथे येतोय. बघूया काय म्हणतोय” असे हिला सांगत असताना. ही वाड्याच्या वरच्या भागाकडे पहात “अहो...! तुम्ही वाडा पाहिला का...?” असं म्हणत डोळे मो...

स्टेटमेंट - संशय - विश्वास

पासबुक बघता बघता “मला चार दिवसात तीन महिन्याचे स्टेटमेंट पाहिजे.” पप्पा रागवून माझ्याशी बोलत होते. “अहो पप्पा, मला इतकं कसं काय लक्षात राहणार की पैसे कसे कसे खर्च केले म्हणून...” मी “का? तू डायरी मेंटेन करत नाही का?” “हो; करतो. पण त्यात खर्च कुठे लिहितो.” मी “ते काही सांगू नकोस. मागील एक महिन्याचा हिशोब पाहिजे म्हणजे पाहिजे” पप्पा आणखी रागावून बोलत होते. मी मान खाली घालून त्यांचे बोलणे ऐकत होतो. “मला वाटले होते की, तुम्हाला गॅरेजच्या बाहेर काढून सेविंगच्या बाबतीत काही शिकाल म्हणून. पण मी साफ चुकलो. इथे तर (पासबुक झटकत) खडखडाट आहे. बारा-पंधरा तास कामावर जाऊन तू करतो काय? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.” पप्पा गुडघ्यांचा आधार घेत उभे राहिले. आईकडे बघत “तुमच्या लाडक्याला काही जमत नसेल ना... तर बंद करा कामावर जाणं. गॅरेजवर परत या. काहीही होणार नाही यांच्याकडून.” पप्पा खूप चिडून बोलत होते. “आहो पप्पा, आत्ता कुठे गॅरेजमधून बाहेर पडून स्क्रीन प्रिंटिंग शिकलो, कॉम्प्युटर शिकलो, आता कुठे जॉब मिळाला आहे. ते करून परत तुमच्याबरोबर गॅरेजवर पण मदत करतो आहे.” मी “गप्प बस्सऽऽऽ... काही सांगू नकोस. मला एक...

चौकट राजा

टकुला घेऊन दादासाहेब सभागृहात पोचलो. पडदा बाजूला करून टकुला हळूहळू हॉलमध्ये नेले. अंधारात चाचपडत चालण्यापेक्षा दरवाजाच्या एका कोपर्‍यात त्याच्या खांद्यावर हात ठेवून थोडावेळ उभा राहिलो. कार्यक्रम चालू झालेला होता. मान्यवरांची भाषणे चालू होती. हॉल गतीमंद आणि मतिमंद मुलांनी आणि त्यांच्या बरोबर आलेल्या पालकांनी भरलेला होता. टकूच्या बाईंनी आम्हाला पाहून हाताने खुणावले. आम्ही दोघे हळूहळू करत त्या दिशेला गेलो. त्यांनी आमची जागा धरून ठेवली होती. टाळ्यांच्या कडकडाटात मान्यवरांचे भाषणं चालू होती. टकू टाळ्यांच्या आवाजाने हसत होता. त्याला खुर्चीवर बसवून स्टेजवर काय काय चालू आहे ते ते त्याच्या कानात सांगत होतो. राज्यातून विविध शाळांमधून विकलांग विद्यार्थ्यांची नाट्यस्पर्धा बघायला मिळणार होत्या. हळूहळू कार्यक्रम चांगला रंगात आलेला होता. भाषणं संपून नाट्य प्रयोग  सुरू झाली होती. एक प्रयोग झाला की हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि टकू खूप खूश व्हायचा. अगदी दात आवळून टाळ्या वाजवायचा. त्याच्याबरोबर मी पण जोरजोरात टाळ्या वाजवायचो. प्रत्येक नवीन प्रयोग सुरू झाला की त्याला माहिती सांगायचो. एका नाटक...

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली. ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की. त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला. “ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.” क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता. वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.” डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कद...

आत्महत्या

तावा-तावा पायर्‍या चढत गच्चीवर गेलो. डोक्यात सणक गेली होती. जोरजोरात हात, पाय झाडत होतो. साचलेल्या पावसाच्या पाण्याने अंगावरचे कपडे खराब करून घेतले. दात आवळत, हाताची मूठ कठड्यावर मारत होतो. राग कोणावर व्यक्त करावा असं झालं होतं. गच्चीवरून खाली सोसायटीतल्या गाड्या दिसत होत्या. असं वाटत होतं सरळ स्वतःला झोकून द्यावं. कठड्यावर उभा राहिलो. जीव घाबरत होता. प्रयत्न होत नव्हता. कापसासारखा पाऊस चालू होता. वार्‍याची सर मागे ढकलत होती. पोटात भीतीचा गोळा उभा राहिला. “डबा तयार आहे खाली या” हिने खालून आवाज दिला. “श्याऽऽऽ.. च्या आईला...” म्हणत कठड्यावरून उतरलो. टाकीत पाणी किती आहे हे बघण्यासाठी लोखंडी जिना चढत असताना जाडी काळी ढभुरी पाल पाइपावरून पळताना दिसली आणि पळताना धापकन गच्चीवर पडली. तिची काहीच हालचाल दिसत नव्हती. कदाचित मेली असावी. पाण्याच्या टाकीत डोकावून पाणी बघून खाली उतरलो तर गच्चीवर ती पाल कुठेच दिसली नाही. घरात शिरताच पुन्हा हिने भांडणाचा सूर ओढला.  “हे काय..., पाणी पाहिला गेले होते; मग कपडे कसे काय खराब झाले! पडले की काय?.” मी एक नाही दोन नाही. “येतांना भाजी घेऊन या. त्याचे फिट्सवर...

ब्लू फिल्म आणि 20 रुपयाची चप्पल

रखरखत्या उन्हात आम्ही चौघे व्हिडिओ गल्लीत फिरत-फिरत एका निमुळत्या गल्लीत पटकन शिरलो. आम्हाला कुणी ओळखीच्यांनी पाहू नये म्हणून डोक्याला नाही पण तोंडाला रुमाल लावलेला होता. एक इसम “पाँच रुपये... पाँच रुपये... पाँच रुपये...” करत तिरप्या नजरेने भुवया वर करत आम्हाला खुणावत होता. घुंगराळे केस, एका कानावर दात कोरायची काडी, डोळ्यात सूरमा, तोंडात बारचा बोकणा, कानात बाळी, एका हातात रुमाल बांधलेला, शर्टाची बटणं उघडे, लोंबलेला बनियन, पायात स्लिपर खालून वाकडी तिकडी वळवलेली पॅन्ट असा सुकलेला एक इसम “चल आता क्या?... 15 मिनट का खेल है. माल एकदम गरम है.” आम्ही एकमेकांकडे बघत त्याला पैसे दिले. तो दुसर्‍या निमुळत्या गल्लीत घेऊन “ये खुर्सी लो, अंदर जाके बैठो. शो अब्बी चालू होएगा.” असे म्हणत तो काळवंडलेला पडदा खासकन बाजूला केला. आत काही लोकं बसलेली दिसली. जणू काही व्हॅम्पायरच दिसत होती. त्याने जसा पडदा खाली सोडला तसा काळाकुट्ट अंधार झाला. लख्ख प्रकाशातून एकदम अंधारात आल्याने काहीच दिसत नव्हते. धडपडत-चाचपडत कुठेतरी खुर्च्या मांडल्या. आमच्या पाठोपाठ काहीजण खुर्च्या घेऊन आमच्या पुढे येऊन बसल्या. त्या बंद खोली...

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

ग्रहण

सकाळची कामे आटोपून आम्ही तिघे जेवायला बसलो होतो. तेवढ्यात आईचा फोन आला, ‘आज ग्रहण आहे तुम्ही सकाळीच जेवून घ्या. या वेळेनंतर काहीही खाऊ नका. संध्याकाळी ग्रहण संपल्यावर अंघोळ करा. देवपूजा झाली की, मग जेवायला बसा.’ असे तिने सांगितले. आम्ही असे कधी केले नव्हते पण ठरवले की, सांगितल्याप्रमाणे करू. प्रयत्न करायला काय हरकत आहे. जेवण झाल्यावर ड्युटीवर निघून गेलो. दुपारी जेवणासाठी आम्ही ऑफीसमधील मंडळी एकत्र आलो. मी ‘डबा का नाही आणला?’ याचे कारण सांगितल्यावर त्यांनी ग्रहणाचा विषय लावून धरला. प्रश्नांचा नुसता भडिमार सुरू झाला. असे कुठे असते का भाऊ कलियुग चालू झाले? पृथ्वीवरील व्यवहार काही थांबणार आहे का? खाल्लं-पिल्लं तर काहीही होत नाही? आजपर्यंत कुणाचे काही वाकडे झाले का? तुला लई पथ्य-पाणी बाबा!, मी बघ 60 वर्ष पूर्ण झाली आजपर्यंत नाही ग्रहांची ना ग्रहणाची बाधा असं जगायचं असतं खाओ-पिओ मौज करो? वगैरे-वगैरे... सगळ्यांचं ऐकून झाल्यावर मी गच्चीवर निघून गेलो. ग्रहणाविषयी विचार करत राहिलो, आपण असे कधी ‘धरणं, सोडणं, पाळणं’ केले नाही. पण आज असे का जागृत झालो? मनात एकच विचार होता की, आईने सांगितले म्हणून. ...

दिल्ली

खूप दिवसांचा रखडत चाललेला प्लान अखेर मुहूर्त लागून ठरला. आणि दिल्लीला पोचलो. सुरुवातीला अजिबात वाटत नव्हते की, दिल्लीत आलो आहे म्हणून. त्यापेक्षा मुंबई तरी बरी असे वाटत होते. आल्या-आल्या अशी प्रतिक्रिया का व्यक्त करावी! कदाचित; स्टेशनपासून ते हॉटेलपर्यंतच्या प्रवासात जे दृष्य गाडीच्या खिडकीतून बघत होतो त्यामुळे असावे. ‘दिल्ली ते गल्ली’ ही म्हण आहे की, केवळ एक डायलॉग आहे माहीत नाही पण; दिल्लीतील प्रत्येक गल्ली न्याहाळत होतो. संपूर्ण प्रवास दिल्लीत काय बघण्यासारखे आहे हे बघण्यातच घालवत होतो. वातावरण तसे बर्‍यापैकी चांगले होते. पण जस-जसा दिल्लीच्या पोटात शिरत होतो. तस-तसा दिल्लीच्या आकाशात धुसर भाग स्पष्ट दिसत होता. हे इतके कटाक्षाने बघत होतो की, एका जाणकाराने सांगितले की, हे प्रदूषण आहे. ज्यात दिल्ली श्वास घेत आहे. पोटात गोळा आला. दिल्लीला यूपी, हरियाणा, उत्तराखंड असे काही राज्य लागून आहेत. त्यामुळे लोक नेमके कोणते हिंदी बोलत होते काही कळत नव्हते. दिल्लीतील खाण्याचे शौकीनपण क्या खूब है! कशात काय टाकतील आणि काय वाढून देतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे पोटाचे आणि जिभेचे नियम काही दिवस बा...

‘आई-वडील’ आणि ‘सोयरे’

कल्पना योगायोगाने बँकेत भेटली. बँकेचा लंचब्रेक असल्याने आम्ही दोघेही एका बाकावर बसून घेतले. तिच्या पायामुळे ती खूपच दमलेली होती आणि डोळेसुद्धा पाणावलेले होते. मीही ‘काय झाले म्हणून लगेचच विचारले’ थोडावेळ गेला आणि ती बोलायला सुरू झाली. ती तिच्या मुलांना प्लेग्रुपला सोडवायला गेली होती. एका रिक्षावाल्या विषयी ती सांगत होती.  “रिक्षावाल्याने मला प्लेग्रुपपाशी सोडले. त्याने रिक्षातून वाकून पाळणा घराची पाटी पाहिली आणि ‘तुमचे मुलं इथे का ठेवता?’ म्हणून विचारले. ‘मी त्या रिक्षावाल्याला, माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला मला काय त्रास झाला. दोन पोरं झाली, त्यात माझा एक पाय कापावा लागला, सासूबाई वारल्या. त्यात हॉस्पिटलचा खर्च, ऑपरेशनसाठी लोकांकडून पैसे उचलले, पोरांना बघायला कुणी नाही... ते दिवस कसेबसे काढले. आता लोकांची देणी द्यायची आहे. नवर्‍याच्या पगारावर काय काय करणार म्हणून मीही आता जॉब करते आहे. पोरं थोडी मोठी झाली. त्यांना समज आली आहे. म्हणून पोरांना इथे ठेवून जावे लागत आहे. असं मी त्याला सांगत होते.’ रिक्षावाला रिक्षाच्या बाहेर येऊन उभा राहिला, “अहो, बघा ना! देव कशी प्रत्येकाची परीक्षा घे...

डॉ ब्रॅण्डी

टकू खूप चिडचिड करतो, त्रास देतो, लवकर झोपत नाही. जसजसा मोठा होत चाललेला होता तसतसा त्याचा जास्त त्रास होत होता. आमच्याही दोघांची सारखी चिडचिड होत असे. एका भल्या माणसाने आम्हाला डॉ ब्रॅण्डीचा उपाय सांगितला. आता सांगितल्याप्रमाणे दोन आठवड्यातून एकदा एक चमचा औषध पोर्‍याला द्यायचे आणि उरलेले आम्ही दोघांनी घ्यायचे म्हणून दुकानातून एक छोटी बाटली घेऊन घरी आलो. त्या रात्री मस्त दोन काचेचे ग्लास काढले. बायको म्हणाली “अ..हं.. तिघांनीही एक-एक चमचा घेवू. एकखट्टी संपवायची नाहीये ती. ते ग्लास ठेवून द्या आणि जेवायला बसा”. मी मिश्किलपणे बाटलीला पाहिले, ‘एक-एक चमचा छ्या... च्यामारी ओठाला लावायची की पोटाला काही कळतच नाही राव... “आता नको. नंतर बघू केव्हा तरी...” असं म्हणत बाटली फ्रिजमध्ये ठेवून दिली. बायको चिडून “आला तुम्हाला राग. जशी कायी बाटली त्याला नाही तुमच्यासाठीच आणलीय.” मनात विचार आला ‘रात्री गुपचुप पिऊन संपून टाकू एकदाची. तुलाही नको नि त्यालाही नको.’ असं म्हणत झोपी गेलो.  ***  दोन-तीन दिवसांनी परत ती बाटली काढून बाहेर ठेवली. म्हंटलं नोर्मलला आली की रात्री तिला आणि मला दोन-दोन पेक करू आण...

निर्णय (Decision)

“तुम्हाला काही समजले का?” अजय “म्हणजेऽऽ?, तुम्ही नेमके कशाबद्दल बोलताहेत?” मॅकी “मला पंडित सरांचा फोन आला होता. आशा... हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे. त्या मुंबईला आहेत.” अजय “अहोऽऽ... काय सांगताय! मी आत्ता काही दिवसापूर्वीच तिला फोन केला होता. पण तिचा फोन अभिमन्यूने घेतला होता. सांगत होता की, ‘रूटीन चेकअपसाठी दवाखान्यात आलो आहोत. ती आतमध्ये आहे. मी तिला फोन करायला सांगतो’ म्हणून. त्याच्यानंतर काही फोन नाही. का? काय झाले त्यांना?” मॅकीने घाबरूनच विचारले. “अं... बातमी तशी एक चांगली आहे आणि एक वाईट आहे. त्यांना दोन जुळी मुलं झाली आहेत आणि दुसरी म्हणजे त्यांचा एक पाय कापावा लागला.” मॅकीने मोठा श्वास भरला आणि रिसिर्व्हरवरच ‘बापरेऽ’ करत सोडला. अजय थोडा थांबून “आताऽऽ... पाय का कापवा लागला ते एवढं नीटसं कळलं नाही पण; तुम्ही त्यांना फोन जरूर करा. ते तुमच्या फोनची वाट बघत असतील.” टु...उक, टु...उक, टु...उक फोन वाजत राहिला. मॅकीचे डोळे भरून आले होते. हाताला घाम येत होता. फोन ठेवून तो पॅन्टला सतत हात पुसत होता. नंतर अश्रू अनावर झाल्याने हुंदके देत रडत होता. तिच्याबाबतीत असे का घडले?... मॅकीचे काम असल्य...